ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर
By Admin | Updated: July 28, 2015 00:17 IST2015-07-28T00:17:53+5:302015-07-28T00:17:53+5:30
जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २५ जुलै रोजी मतदान पार पडले.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर
अमरावती : जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २५ जुलै रोजी मतदान पार पडले. सोमवार २७ जुलैला सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारनंतर सर्व निकाल जाहीर झाले. निवडणुकीदरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.
सोमवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये मोर्शी तालुक्यातील वऱ्हा येथील पोटनिवडणुकीत सुनीता इंगळे विजयी झाल्या. गोराळा, बेलोना, शिरूर व मायवाडी येथील सदस्यपदे रिक्त राहिली आहे.
चिखलदरा तालुक्यात खिरपाणी ग्रामपंचायतीमध्ये सीताराम जामुनकर, तारा सुरत्ने, साहेबराव सुरत्ने, नंदलाल कोरला, सुमन सुरत्ने, निशा सुरत्ने अविरोध निवडून आल्यात. माखला ग्रामपंचायतीमध्ये शंकर दारसिंबे विजयी झाले. प्रमिला कास्देकर, मंगराय कास्देकर, रामेश्वर जांबेकर, शांती दारसिंबे, किशोरीलाल दहीकर बिनविरोध निवडून आलेत. अढाव ग्रामपंचायतीमध्ये लालजी दहीकर बिनविरोध, खटकाली ग्रामपंचायतीत सदाशिव गवते, शोभा गवते, विमल धांडेकर, जयकिशोर गवते, संजय धांडेकर, विमल धांडेकर, सदाशिव गवते, निर्मला मावस्कर, शोभा गवते विजयी झाल्यात. अमझरी ग्रामपंचायतीमध्ये जयश्री कास्देकर, प्रमिला कास्देकर बिनविरोध, परसराम धांडेकर विजयी झाले. आडनदीमध्ये चंद्रकला दहिकर विजयी, कोहानामध्ये रुपी अथोटे बिनविरोध निवडून आले.
चांदूररेल्वे तालुक्यात येरड बाजार येथे धनराज मरस्कोल्हे, सीमा देशमुख, नंदा मेश्राम, राजेंद्र देशमुख, जया जीवने, संजय मोहोकार विजयी झाले. सातेफळमध्ये चंद्रकला तितरे बिनविरोध तर कळमजापूर, पाथरगाव येथील पदे रिक्त राहिली.
दर्यापूर तालुक्यात कळाशीमध्ये माधुरी येवले, करतखेडा येथे मनोरमा खेडकर, अवधुत जोहरी, सारिका खेडकर, प्रकाश खडे, आशा अडगोल विजयी, लेहेगावमध्ये देवंगणा नागे बिनविरोध, घोडचंदीमध्ये एक पद रिक्त राहिले.
तिवसा तालुक्यात निंभोरा देलवाडी येथे छाया पुनसे, ठुणीमध्ये नलू गावंडे, दापोरी येथे भारती खरासे विजयी झाले. दापोरी येथे मंगला उईके अविरोध निवडून आले.