शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निर्बंध शिथिल, रात्री 8 वाजेपर्यंत मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:01 IST

सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य-पेय विक्रेते, पिठाची गिरणी, कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी यासह सर्व खाद्य दुकाने, दूध संकलन व वितरण केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तसेच शनिवार व रविवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ४८ दिवसांनंतर व्यापारीपेठेला बहर, शनिवारी ३ पर्यंत, रविवारी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून संचारबंदीत शिथिलता देण्यात आलेली आहे. सर्व दुकाने, आस्थापनांना सोमवार ते शुक्रवारी रात्री  ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तथापि, संसर्ग वाढू नये, याकरिता नागरिकांद्वारा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आवश्यक आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी जारी केले आहेत.या आदेशानुसार, सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य-पेय विक्रेते, पिठाची गिरणी, कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी यासह सर्व खाद्य दुकाने, दूध संकलन व वितरण केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तसेच शनिवार व रविवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा अनलॉक झाल्याने  सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.लग्नात  ५०, अंत्यसंस्कारास २० व्यक्तींनाच परवानगीलग्नसमारंभासाठी वधू, वर, आचारी व वाजंत्रीसह केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच परवानगी आहे. समारंभाची परवानगी मिळविण्यासाठी ‘संवाद’ संकेतस्थळावर जाऊन ‘इव्हेंट परमिशन’ या शीर्षकावर क्लिक करून अर्ज करावा. अर्जात माहिती भरल्यावर अर्जाची स्थिती याच संकेतस्थळावर तपासता येईल. अंत्यविधी कार्यक्रमासाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी आहे.- तर मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंडसार्वजनिक स्थळी मास्क नसल्यास ७५० रूपये दंड. सुरक्षित अंतर व दक्षतेचे नियम दुकानांत पाळले जात नसतील, तर दुकानदार किंवा आस्थापनेवर ३५ हजार रुपये दंड. मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी ५० हून अधिक व्यक्ती आढळल्यास मंगल कार्यालयाला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास हॉल चालकावर फौजदारीसह पुढील चार महिन्यांसाठी मंगल कार्यालय सील करण्यात येणार आहे.    

उपाहारगृहांना ५० टक्के आसन क्षमतेची मुभाहॉटेल, उपाहारगृहे, खानावळ, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ पर्यंत एकूण ५० टक्के आसन क्षमतेसह व दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा पुरवू शकतील. शनिवारी व रविवारी उपाहारगृहांना घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. हॉटेल व लॉजिंगमध्ये ३३ टक्के निवास मर्यादा आली आहे.

शासकीय, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरूसर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याबाबत सूचना आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ण आसन क्षमतेसह व मालवाहतूक पूर्णवेळ करता येईल. सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, औषधालये पूर्णवेळ सुरू राहतील.

बिगर जीवनावश्यक दुकाने रविवारी बंदसर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक (शॉपिंग मॉलसह) दुकानांना सोमवार ते शुक्रवार रात्री ८  पर्यंत  तसेच शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रविवारी ही दुकाने बंद राहतील.  

हे राहणार बंद

- सर्व सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, बगिचे, उद्याने, खेळाची मैदाने ही कसरती, सायकलिंग, व्यायाम, धावण्यासाठी रोज रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहतील. सर्व आंतर मैदानी खेळ बंद राहतील. केवळ बाह्य मैदानी खेळांना मुभा राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

- सर्व चित्रपटगृहे व मॉल्समधील किंवा स्वतंत्र बहुपडदा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, पूजास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार