अनधिकृत मांस विक्रीला लगाम; बेलपुऱ्यात तणाव
By Admin | Updated: October 3, 2015 00:08 IST2015-10-03T00:08:37+5:302015-10-03T00:08:37+5:30
गांधी जयंती दिनी मांस विक्रीला मनाई असताना स्थानिक बेलपुरा परिसरात महापालिका चमुने मांस विक्री उधळून लावली.

अनधिकृत मांस विक्रीला लगाम; बेलपुऱ्यात तणाव
गांधी जयंती दिनी कारवाई : दोन ट्रक साहित्य जप्त
अमरावती : गांधी जयंती दिनी मांस विक्रीला मनाई असताना स्थानिक बेलपुरा परिसरात महापालिका चमुने मांस विक्री उधळून लावली. त्यामुळे बेलपुऱ्यात काही काळ तणाव निर्माण झाला. गुरुवारी झालेल्या दिवसभरातील कारवाईत दोन ट्रक मांस विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ आॅक्टोंबर रोजी मांस विक्री, पशु व प्राण्यांची कत्तल करणे बंद असताना गुरुवारी शहरात अनधिकृत मांस विक्री होताना दिसून आले. परिणामी महापालिकेचे सहायक पशु शल्य अधिकारी सचिन बोंद्र यांच्या नेतृत्वात मांस विक्री विरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. येथील शक्रवारी बाजार व बेलपुऱ्यात सुरु असलेल्या मांस विक्रीला लगाम लावताना विक्रेत्यांनी विरोध केला. विक्रेत्यांनी या कारवाईस नकार करताना चमुसोबत वाद घातला.
गांधी जयंती दिनी मांस विक्री करु नये, यासाठी विक्रेत्यांना नोटिसी बजावण्यात आल्या होत्या. तरिदेखील शहरात मांस विक्री होताना दिसून आले. परिणामी कारवाई करुन लगाम लावण्यात आले.
- सचिन बोंद्रे
सहायक पशु वैद्यकीय अधिकारी