रस्त्यांच्या निवडीची जबाबदारी पालकमंत्र्यांवर
By Admin | Updated: January 30, 2016 00:22 IST2016-01-30T00:22:49+5:302016-01-30T00:22:49+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या रस्त्यांची निवड करण्याकरिता पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समितीचे गठित करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या निवडीची जबाबदारी पालकमंत्र्यांवर
चार सदस्यीय समिती : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
अमरावती : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या रस्त्यांची निवड करण्याकरिता पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समितीचे गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुठल्या रस्त्यांचा या नवीन योजनेत समावेश करावा, ही या समितीची कार्यकक्षा राहील. प्रत्येक जिल्हास्तरावर समितीचे गठित करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीचे सुकाणू पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे देण्यात आले आहे. पोटेंच्या अध्यक्षतेखालील या समितीत मोर्शीचे आ.अनिल बोंडे आणि मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर हे आमदारद्वय सदस्य तर संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता समितीचे सदस्य सचिव आहेत. पालकमंत्र्यांसह ते निवडतील, असे दोन विधानसभा सदस्यांना जिल्ह्यातील रस्त्यांची तालुकानिहाय यादी सदस्य सचिव सादर करतील, अशी तरतूद यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)