युवा स्वाभिमानचा एक लाख किलो साखर वाटपाचा संकल्प
By Admin | Updated: October 25, 2016 00:11 IST2016-10-25T00:11:56+5:302016-10-25T00:11:56+5:30
आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने दिवाळीत गोर-गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करता यावा,..

युवा स्वाभिमानचा एक लाख किलो साखर वाटपाचा संकल्प
अमरावती : आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने दिवाळीत गोर-गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करता यावा, यासाठी एक लाख किलो साखर वाटप केली जाणार आहे. शनिवारी शहरातील १२ केंद्रांवर साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
साखर वाटपाचा शुभारंभ आ. रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आले. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्ड धारकांना साखर वाटप केली जात आहे. बडनेरा नवीवस्ती, जुनिवस्ती तसेच यशोदानगर, गांधी आश्रम येथे केंद्रातून पहिल्या टप्प्यात साखर वाटप केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जात असल्याने सामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. यावेळी लप्पीसेठ जाजोदिया, नीळकंठ कात्रे, नगरसेवक विजय नागपुरे, अजय जयस्वाल, सुधीर लवनकर, विलास वाडेकर, निलेश भेंडे, निलेश मेश्राम, गोलू देशमुख, विशाल परचाके, विक्की गोंडाणे, इरशाद शेख, नंदा सावदे, नितीन बोरेकर, तुषार पाठक, प्रवीण मेश्राम, रिजवान, मंगश चव्हाण,राय काका, गौतम हिरे, बाळू ठवळी, विजू बहाळे, छाया जवंजाळ, लता अंबुलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)