१ लाख ३५ किलो साखर वाटपाचा संकल्प
By Admin | Updated: November 14, 2015 00:20 IST2015-11-14T00:20:34+5:302015-11-14T00:20:34+5:30
गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे.

१ लाख ३५ किलो साखर वाटपाचा संकल्प
युवा स्वाभिमानचा उपक्रम : भातकुली परिसरातील जनतेसाठी शुभारंभ
अमरावती : गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भातकुली ग्रामीण परिसरातून करण्यात आला आहे. १ लाख ३५ हजार किलो साखर वाटपाचा संकल्प आमदार रवी राणा यांनी सोडला आहे.
साखर वाटप भातकुलीसह बडनेरा, महादेव खोरी, यशोदानगर, संजय गांधीनगर, गांधी आश्रम, महाजनपुरा, गडगडेश्वर, पार्वतीनगर, जेवडनगर, चवरेनगर, राजापेठ, अंजनगाव बारी आदी ठिकाणी स्टॉल लावून वितरित केली जाणार आहे. ८ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. साखर वाटपाचा लाभ युवा स्वाभिमान सदस्यता कार्डधारकांना मिळणार आहे. बडनेरा येथील नवीवस्ती व जुनीवस्ती परिसरात आमदार रवी राणा यांच्या हस्ते साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, अजय जयस्वाल, नील निखार, विलास वाडेकर, सुधीर लवणकर, नाना आमले, नितीन बोरेकर, अभिजीत देशमुख, अलका अंबाडकर, ज्योती काळे, सिद्धार्थ बनसोड, दीपक जलतारे, अवी काळे, मंगेश चव्हाण, रावसाहेब टाले, प्रदीप सोनटक्के प्रफुल्ल सानप, अजय बोबडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५५ हजार किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ५५००० किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले. भातकुली ग्रामीण भागात साखर मिळविण्यासाठी युवा स्वाभिमानच्या कार्डधारकांनी एकच गर्दी केली होती. दिवाळीचे औचित्य साधून साखर वाटप या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.