बोंड अळीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:09 IST2017-12-09T00:09:07+5:302017-12-09T00:09:36+5:30

सध्या कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे.

Resolution to compensate for the loss of bonds | बोंड अळीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी ठराव

बोंड अळीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी ठराव

ठळक मुद्देएकमताने निर्णय : जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : सध्या कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याचा ठराव गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला.
जिल्ह्यात कपाशीचे पीक ऐन बहरात आले असताना बोंड अळीने आक्रमण केले. यामुळे शेतकºयांवर बहरत असलेले कपाशीचे पीक उपटण्याची वेळ आली आहे. शेतकºयांनी यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीतून समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, या पिकांवर बोंड अळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांपाठोपाठ कपाशीवरील बोंडअळीने शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकºयांची परिस्थिती बिकट झाल्यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यातील कपाशी पिकांचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव गौरी देशमुख, बबलू देशमुख, संजय घुलक्षे व अन्य सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभेत मांडला. तो एकमताने पारित करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, भाजपा गटनेता प्रवीण तायडे, गौरी देशमुख, सुहासिनी ढेपे व सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Resolution to compensate for the loss of bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.