आरक्षण खुले, सरपंचपद मागासवर्गीयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:01+5:302021-02-21T04:24:01+5:30

फोटो पी २० वाठोडा चांदूर बाजार : तालुक्यातील चौथ्या टप्प्याच्या सरपंच निवडणुकीत वाठोडा येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाची निवडणूक ...

Reservations open, Sarpanchpada to backward classes | आरक्षण खुले, सरपंचपद मागासवर्गीयाकडे

आरक्षण खुले, सरपंचपद मागासवर्गीयाकडे

फोटो पी २० वाठोडा

चांदूर बाजार : तालुक्यातील चौथ्या टप्प्याच्या सरपंच निवडणुकीत वाठोडा येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. तेथील सरपंचपद हे सर्वसाधारण गटाकरिता निघाले होते. त्यामुळे या पदासाठी खुल्या प्रवगाचे सर्व सात सदस्य पात्र होते. मात्र, निवडून आलेल्या सदस्यांनी मागासवर्गीय सदस्याला अविरोध सरपंचपदी विराजमान केले. वाठोडा ग्रामपंचायतीने यातून सामाजिक सौहार्दाचे उदाहरण जिल्ह्यापुढे ठेवले आहे.

वाठोडा ग्रामपंचायतमध्ये खुल्या प्रवर्गातील सात सदस्य निवडून आले. एका गटाचे पाच सदस्य असून, विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत. निवडणुकीनंतर सर्व हेवेदावे विसरून व पक्षीय राजकारण बाजूला सारून सर्व सदस्य एकत्र आले. त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपद असले तरीही एकमताने मागासवर्गीय उमेदवाराला पाठिंबा देऊन अविरोध सरपंच करण्याचे ठरविले. त्यानुसार सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आला. सर्वांनी या दोन्ही पदांवर निवडीला एकमुखाने सहमती दर्शविली. सरपंचपदी नीलेश वानखडे यांची, तर उपसरपंचपदी रामदास मोहोड यांची अविरोध निवड करण्यात आली. गावातील सरपंचाची निवड अविरोध व एकमताने मागासवर्गीय व्यक्तीला सरपंचपद देण्यासाठी मंगेश ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या परिश्रमाला ग्रामपंचायत सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

बॉक्स

वडुरा येथे बदलणार सरपंच!

सात सदस्यीय वडुरा ग्रामपंचायतची सरपंच-उपसरपंच निवड प्रक्रियेबाबतीत पहिली सभा पार पडली. यामध्ये संपूर्ण सातही सदस्यांनी सर्वानुमते एक अनोखा निर्णय घेतला. सातपैकी पाच सदस्यांनी प्रत्येकी एक वर्षासाठी सरपंच व दोन सदस्यांना उपसरपंच केले जाईल. म्हणजेच पाच वर्षांंत पाच सरपंच व दोन उपसरपंच या ग्रामपंचायतीला लाभणार आहेत. यानुसार, प्रथम सरपंच म्हणून पद्मा प्रकाश चौधरी यांची, तर ज्योत्स्ना विशाल वानखडे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.

Web Title: Reservations open, Sarpanchpada to backward classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.