४१८ ग्रामपंचायतींतील सरपंचपदाचे आरक्षण निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:40+5:302021-02-06T04:21:40+5:30
मुख्य बातमी अमरावती : जिल्हयातील सात तालुक्यांतील एकूण ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी तहसीलस्तरावर सोडतीद्वारे काढण्यात आले. त्यातील ...

४१८ ग्रामपंचायतींतील सरपंचपदाचे आरक्षण निघाले
मुख्य बातमी
अमरावती : जिल्हयातील सात तालुक्यांतील एकूण ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी तहसीलस्तरावर सोडतीद्वारे काढण्यात आले. त्यातील २०७ ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्य सरपंचपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, वरूड, भातकुली व धामणगाव रेल्वे या सात तालुक्यातील सरपंचपदाचा आरक्षित संवर्ग घोषित झाल्याने आता खºया अर्थाने गावगाड्यातील राजकारणास सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १५ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा समावेश आहे.
असे आहे संवर्गनिहाय आरक्षण
अचलपूर : तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींमधील १६ ग्रामपंचायतींमध्ये एससी, ११ मध्ये एसटी, २० ठिकाणी ओबीसी व २५ ठिकाणी सर्वसाधारण संवर्गातील सदस्य सरपंच बनेल.
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतसाठी सरपंच आरक्षण काढण्यात आले. त्यात १३ ठिकाणी एससी, दोन ठिकाणी एसटी, १ ठिकाणी ओबीसी तर, २१ ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण निघाले.
वरूड : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण काढण्यात आले. भातकुली : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी १३ ठिकाणी एससी, तीन ठिकाणी एसटी, १३ ठिकाणी ओबीसी व १९ ठिकाणी सर्वसाधारण संवर्गासाठी सरपंच आरक्षण निघाले.
चिखलदरा : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यात २६ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत.
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकी एससीसाठी ९, एसटीसाठी ४, ओबीसींसाठी १७ तर ओपनसाठी ३२ ग्रामपंचायती राखीव आहेत.
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींपैकी एससी १४, एसटीसाठी २, ओबीसींसाठी १८ तर सर्वसाधारण संवर्गासाठी ३४ ग्रामपंचायतचे सरपंचपद राखीव झाले.
--------
तालुका आरक्षण सोडत काढलेल्या महिलांसाठी राखीव
ग्रामपंचायती
अचलपूर : ७२- ३६
अंजनगाव : ४९- २३
चिखलदरा : ५३- २६
वरूड : ६६ - ३४
भातकुली ४८ - २५
धामणगाव रेल्वे ६२ - ३०
नांदगाव खंडेश्वर : ६८ - ३३
-----------------------