आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

By Admin | Updated: October 6, 2016 00:28 IST2016-10-06T00:28:19+5:302016-10-06T00:28:19+5:30

राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे.

Reservation of choice, choice of diamonds, check-up of alternative groups | आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

हादरा : काहींना नव्या घरोब्याचा शोध तर काहींना मिळणार राजकीय विश्रांती
अमरावती : राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. निवडणूक लढविण्यासाठी काहींना गट (सर्कल) नसल्यामुळे त्यांना राजकीय दृष्ट्या विश्रांती घेण्याचा प्रसंग ओढावला आहे. तर काहींना नव्या घरोब्यासाठी चाचपणी करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद सर्वसाधारण निवडणूक होणार असल्याच्या धर्तीवर आरक्षण काढल्या जाणार असल्या बाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. नेमके आरक्षणात काय होणार, याकडे वेध लागले असताना बुधवारी गटाच्या आरक्षणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
बुधवारच्या आरक्षण सोडतीनंतर सोडतीनंतर ईच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर या पदाधिकांऱ्यासह कॉग्रेसचे गटनेता तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, सुधीर सुर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, मोहन सिंगवी, मोहन पाटील, उमेश केने, ज्योती आरेकर, प्रवीण घुईखेडकर, ममता भांबुरकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, श्रीपाल पाल, विक्रम ठाकरे, मंदा गवई, विनोद डांगे आदींना आरक्षणाचा फटका बसला आहे.
नव्या आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ हे चित्र अनुभवता आले. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटाची फेररचना करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या प्राधान्य क्रमानुसार अनेक गटांमध्ये काहे गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये अंजनगाव सुर्जी व भातकुली या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गट कमी झाले आहेत. तर अमरावती आणि धारणी या दोन तालुक्यात दोन गट नव्याने वाढले आहेत. या बदल्याचा फटका पदाधिकाऱ्यांना बसला आहे. तर अनेक ईच्छुकांना या आरक्षण बदल्याने संधी चालून आली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (प्रतिनिधी)

विद्यमान सदस्य घेणार नव्या घराचा शोध
आरक्षण सोडतीमध्ये बबलू देशमुख यांचा कुऱ्हा मतदार संघ राखीव झाल्याने ते चांदुरबाजार मधील घाटलाडकी सर्कल मधून लढण्याची शक्यता आहे. रवींद्र मुंदे याचा वाढोणा रामनाथ गट राखीव झाल्याने त्यांनी नांदगाव मधील लोणी टाकळी गटातून निवडणूक लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सुरेखा ठाकरे यांचा आसेगाव मतदार संघ राखीव असल्यामुळे त्या कांडली गटातून निवडणूृक लढण्याची शक्यता आहे. प्रताप अभ्यकंर हे धामणगाव गढी येथून नशीब अजमावण्याची शक्यता आहे. तसेच सुधीर सुर्यवंशी, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, मंदा गवई, सदाशिव खडके आदी काही विद्यमान पदाधिकारी व सदस्य नव्या घरोब्याच्या शोधात आहेत. तर काहीनी कुटूंबातील महिलांना रिंगणात लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खरे चित्र हे निवडणूक कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Reservation of choice, choice of diamonds, check-up of alternative groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.