दर्यापूर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:13+5:302021-02-05T05:22:13+5:30
सर्वसाधारणकरिता मार्कंडा, खैरी, सांगवा बु., महिमापूर, नायगाव, नरदोडा, उपराई, लेहेगाव, नाचोना, ईटकी, कळमगव्हाण, सांगळूद, चंद्रपूर, टाकळी, उमरी इतबारपूर (खुला), ...

दर्यापूर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
सर्वसाधारणकरिता मार्कंडा, खैरी, सांगवा बु., महिमापूर, नायगाव, नरदोडा, उपराई, लेहेगाव, नाचोना, ईटकी, कळमगव्हाण, सांगळूद, चंद्रपूर, टाकळी, उमरी इतबारपूर (खुला), रामगाव, लोतवाडा, नांदरूण, म्हैसपूर मोचर्डा, रामतीर्थ, नरसिंगपूर, डोंगरगाव, माटरगाव, कान्होली, कोळंबी, जसापूर, बेंबळा बु, करतखेडा, भामोद व वडाळगव्हाण (महिला) येथील सरपंचपद राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता खल्लार, बोराळा, गौरखेडा, वरुड बु., जैनपूर, घोडचंडी, चांडोळा, हिंगणी मिर्झापूर, आराळा, नांदेड बु. (खुला), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- चंडिकापूर, थिलोरी, कळाशी, लासूर, शिवर बु., तेलखेडा, धामोडी, शिंगणवाडी, सासन बु., पनोरा (महिला) येथील सरपंचपद राखीव आहे. अनुसूचित जातीकरिता गायवाडी, उमरी ममदाबाद, घडा, वडुरा, एरंडगाव, सुकळी, पिंपळखुटा, पिंपळोद, शिरजदा (खुला), दारापूर, माहुली धांडे, येवदा, बेलोरा, वडनेर गंगाई, रुस्तमपूर, सामदा, अडुळा बाजार, सासन रामापूर, टोंगलाबाद (महिला) येथील सरपंचपद राखीव आहे. अनुसूचित जमातीकरिता आमला, शिंगणापूर (खुला), पेठ इतबारपूर, गोळेगाव, नालवाडा (महिला) ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निघाले. उपविभागीय अधिकार मनोज लोणारकर, निवडणूक निर्णय अधिकारी योगेश देशमुख, नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर, सहायक अरुण राजगुरे यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.
दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रवर्गातील सदस्य नाही
सासन रामापूर आणि अडुळा बाजार ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाले. मात्र, या दोन्ही ठिकाणी या आरक्षित गटातून एकही सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला आहे.