जयश्री मोरय्यांचे पीठासीन सभापतींवर शरसंधान

By Admin | Updated: October 21, 2016 00:19 IST2016-10-21T00:19:44+5:302016-10-21T00:19:44+5:30

शहर अभियंत्यांबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आग्रही असलेल्या जयश्री मोरय्या यांनी थेट पीठासीन सभापतींवर...

Researchers on the presidency of Jayashree Morai's presidency | जयश्री मोरय्यांचे पीठासीन सभापतींवर शरसंधान

जयश्री मोरय्यांचे पीठासीन सभापतींवर शरसंधान

नगरसेवकांची मध्यस्थी : प्र्रश्नोत्तराचा तास रंगला
अमरावती : शहर अभियंत्यांबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आग्रही असलेल्या जयश्री मोरय्या यांनी थेट पीठासीन सभापतींवर शरसंधान केल्याने आमसभेत एकच हलकल्लोळ माजला. महापौरांविरोधात त्या अत्यंत आक्रमक झाल्याने काही नगरसेवकांना मध्यस्थी करावी लागली.
गुरुवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व जयश्री मोरय्या यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे सांगत सभागृह डोक्यावर घेतले. अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांच्या नियुक्तीबाबत मोरय्या यांनी २९३ व २९४ असे दोन प्रश्न आमसभेत उपस्थित केले होते. मात्र सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावेळी आपण कुठल्या प्रश्नावर बोलताय, अशी विचारणा महापौरांनी केली. त्यावर आपण विषय पत्रिकेचा अभ्यास केला नाही का, असा उलट सवाल मोरय्या यांनी उपस्थित केला. त्यावर महापौर भडकल्या. मी अभ्यास केलाय, असे सांगत आपण सभागृहाची मर्यादा पाळा, मुझे हाउस चलाना है, असे सांगत महापौरांनी त्यांच्या प्रश्नाचे काय झाले़ याचे उत्तर देण्याचे प्रशासनाला सांगितले. तुमचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात येईलच, तेव्हा त्यावर बोला. असेही महापौरांनी बजावले. त्यानंतरही महापौर म्हणजे वन मॅन शो नसल्याचा आक्रस्ताळेपणा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने उत्तर दिल्यानंतरही मोरय्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांना पिठासिन सभापतींनी बसण्यास सांगितले. तुम्ही बसा अन्यथा तुम्हाला बाहेर काढावे लागेल, असा दम देण्यात आला. शेवटी महापौरांच्या समर्थनार्थ अनेक नगरसेवक सरसावले. मागील आमसभेत सभागृहाने तुमची हतबलता अनुभवली, असा थेट हल्ला महापौरांवर करण्यात आला. सुजाता झाडे यांच्यासह जयश्री मोरे ,निलिमा काळे यांनी मोरय्या यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या खडाजंगीतच मोरय्या यांचे दोन्ही प्रश्न पुढील आमसभेत प्राधान्याने घ्यावीत, असे निर्देश पीठासीन सभापतींनी दिले. शेवटी या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Researchers on the presidency of Jayashree Morai's presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.