लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मानवी जीवन सुसह्य करण्याची संकल्पना साकारणाऱ्या तब्बल १०५ विज्ञान प्रतिकृती तालुक्यातील अशोकनगर येथे मांडण्यात आल्या. दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त येथे बालसंशोधकांचा मेळा भरला. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.अशोकनगर येथील देवराव ठाकरे विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपप्राचार्य सुलभा कडू यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते झाले. धामणगाव रेल्वे पंचायत समितीचा शिक्षण विभाग, तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक मंडळ व देवराव ठाकरे विद्यालय यांचा हा संयुक्त उपक्रम होता. विशेष निमंत्रित म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर, प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती वनिता राऊत, माजी सभापती गणेश राजनकर, सरपंच सीमा गुल्हाने, सविता ठाकरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोझरी येथील माजी प्राचार्य तुरकाने उपस्थित होते. व्यासपीठावर उपसरपंच राजू केला, गटशिक्षणाधिकारी सुषमा मेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड, सेफलाचे प्राचार्य गणेश चांडक, देवराव ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय देशकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिन प्रमोद आंबटकर, जिल्हा समन्वयक राजेश्वर राऊत, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनंत डुमरे, सचिव संजय शिरभाते, केंद्रप्रमुख गौतम गजभिये, विजय सगळे, दिलीप चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. पं.समिती सभापती सचिन पाटील, सदस्य गणेश राजनकर यांनी विचार व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनाला जिल्हा परिषदेकडून २५ हजारांचे स्नानगृह मिळाल्याबद्दल सुषमा मेटकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानले. संचालन अनंत डुमरे, कुशल पत्रे यांनी केले. आभार विलास वानरे यांनी मानले.१०५ प्रतिकृतींचे सादरीकरणतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभागात ७७, माध्यमिक विभागात २७, तर उच्च माध्यमिक विभागात फक्त एका प्रतिकृतीचा समावेश होता. त्याच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांनी साकारल्या.
अशोकनगर येथे संशोधकांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:02 IST
मानवी जीवन सुसह्य करण्याची संकल्पना साकारणाऱ्या तब्बल १०५ विज्ञान प्रतिकृती तालुक्यातील अशोकनगर येथे मांडण्यात आल्या. दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त येथे बालसंशोधकांचा मेळा भरला.
अशोकनगर येथे संशोधकांचा मेळा
ठळक मुद्देतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी