मोबाईल लोकेशनवरुन बुरखाधारी महिलांचा शोध

By Admin | Updated: March 19, 2015 00:23 IST2015-03-19T00:23:39+5:302015-03-19T00:23:39+5:30

सराफा बाजारातील १४ लाखांच्या सोनसाखळ्या चोरी प्रकरणात आता मोबाईल लोकेशनवरुन बुरखाधारी महिलांचा शोध घेणे पोलिसांनी सुरु केले आहे.

Research on women from mobile locations | मोबाईल लोकेशनवरुन बुरखाधारी महिलांचा शोध

मोबाईल लोकेशनवरुन बुरखाधारी महिलांचा शोध

अमरावती : सराफा बाजारातील १४ लाखांच्या सोनसाखळ्या चोरी प्रकरणात आता मोबाईल लोकेशनवरुन बुरखाधारी महिलांचा शोध घेणे पोलिसांनी सुरु केले आहे. घटनेपूर्वी व नंतरच्या वेळेत सराफा बाजार परिसरातील मोबाईल टॉवरवरुन किती व कोणी कॉल केले का यांचा तपास पोलीस करीत आहेत.
पाच दिवस ओलांडून गेले, मात्र अद्याप सोनसाखळ्या चोरी प्रकरणातील बुरखाधारी महिलांचा शोध लागला नाही. पोलीस विभाग सर्व बाजूने तपास करीत आहेत. मात्र अद्याप ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. खोलापुरी गेट व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठारी यांचे जेल्वर्स तसेच अन्य प्रतिष्ठानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. तसेच काही जुन्या आरोपींंची चौकशी सुरु केली आहे. घटनेपुर्वी व नंतर सराफा बाजार परिसरातील मोबाईल टॉवरवरील कॉलकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. बुरखाधारीजवळ मोबाईल आढळून आला नाही, मात्र त्यांनी चोरी करण्याआधी नियोजन करताना मोबाईलचा वापर केला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Research on women from mobile locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.