दंत महाविद्यालयामध्ये संशोधन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:13 IST2021-09-03T04:13:03+5:302021-09-03T04:13:03+5:30

अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित दंत महाविद्यालय व रुग्णालयात ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या संशोधन शिबिराला ...

Research camp in dental college | दंत महाविद्यालयामध्ये संशोधन शिबिर

दंत महाविद्यालयामध्ये संशोधन शिबिर

अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित दंत महाविद्यालय व रुग्णालयात ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या संशोधन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लागला.

अमरावती शहरातील न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड रिसर्च या संस्थाद्वारे शिबिर घेण्यात आले होते तसेच शिबिरात संशोधनाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. डॉक्टर व विद्यार्थ्यांना होणाऱ्या लाभासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर व विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित केल्यामुळे त्या संशोधनाचा उर्वरित डॉक्टर व पदवी घेत असलेल्या विद्यार्थांना किती लाभ मिळू शकतो, याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे आयोजन दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश गोंधळेकर यांनी केले. प्रपाठक डॉ. केतकी काळेले-भोकरे यांच्या न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड रिसर्चतर्फे आशिष तरार यांनी संपूर्ण माहिती शिबिरात आलेल्या सर्व वरिष्ठ दंतचिकित्सक व विद्यार्थी यांना दिली. यावेळी दंत महाविद्यालयातील सर्व दंतचिकित्सक व विद्यार्थी उपस्थित होते.

,............

Web Title: Research camp in dental college