शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुरात दोघे तरुण वाहून गेले, रेस्क्यू पथकाद्वारे शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:02 IST

बचाव पथकाद्वारे सकाळपासून शोध सुरू आहे.

अमरावती : शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे येवदा व ऋणमोचन येथील नद्यांना आलेल्या पुरात दोघे वाहिल्याची घटना घडली. बचाव पथकाद्वारे सकाळपासून शोध सुरू आहे. संततधार पावसामुळे  ऋणमोचन येथील पूर्णा नदीत इर्शाद बेग शहादत बेग हा ३० वर्षीय तरुण वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला भातकुली येथील नगरसेवक तमीझ पठाण यांनी दिली. लागलीच या ठिकाणी जिल्ह्याचे शोध व बचाव पथकाची १४ सदस्यीय टीम रवाना झाली. तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली.

येवद्यात शेतमजूर गेला वाहूनदर्यापूर तालुक्यातील येवदा येथे शेतात कामाला निघालेला शेतमजूर राहुल गणेश चांदूरकर (२८) हा शहानूर नदी पार करीत असताना शनिवारी सकाळी पाय घसरल्याने प्रवाहात वाहून गेला. त्याचा अद्यापही शोध लागला नाही. त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता एनडीआरएफ पथक दाखल झाले. पंधरा दिवसांपासून सतत पावसामुळे शहानूर धरणाची पातळी वाढल्यामुळे काल मध्यरात्री धरणाची तीन दरवाजे उघडली. शहानूर नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. याशिवाय येवदाजवळील कातखेडा गावालगतचा मातीचा बंधारा फुटून वाहिलेले पाणी येवदा गावात शिरल्याने रामनगर, माळीपुरा, खाटीकपुरा, पेठपुरा, आठवडी बाजारापर्यंत  प्अनेक घरांमध्ये  पाणी शिरले. १९९८, २००६, २०१२, २०१३, २०१४ मध्येदेखील गावात पाणी  शिरले होते.  दरम्यान, घटनास्थळी नायब तहसीलदार गाडे, सरपंच प्रदीप देशमुख, मंडळ अधिकारी बोंद्रे, तलाठी डोळे, कासरकर, रायबोले, कातखेड येथील पोलीस पाटील रायबोले उपस्थित झाले होते. सायंकाळपर्यंत मृतदेह रेस्क्यू पथकाला गवसला नव्हता.

टॅग्स :Amravatiअमरावती