जिजाऊंच्या लेकींचे शासनाला निवेदन

By Admin | Updated: September 23, 2016 00:09 IST2016-09-23T00:09:59+5:302016-09-23T00:09:59+5:30

लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता.

The request for the government of Jijau | जिजाऊंच्या लेकींचे शासनाला निवेदन

जिजाऊंच्या लेकींचे शासनाला निवेदन

मराठा एकजुटीची क्रांती : लक्ष मराठे-दक्ष मराठे, युवतींचा विक्रमी सहभाग
अमरावती : लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता. नेहरु मैदानातून निघालेला मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात विसावला. यावेळी शासनाला सादर करावयाच्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. काही युवतींनी स्वयंस्फुर्तीने भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अमुल्या कृष्णकुमार सोळंके, जानकी नितीन यावलीकर, अनुष्का संजय रडके व पुनम रामकृष्ण चिखलकर या जिजाऊंच्या चार लेकींनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आठ मागण्यांचे निवेदन सादर केले.

कोपर्डी येथे घडलेल्या नृशंस घटनेतील सर्व नराधम गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी कायद्यामध्ये त्वरित सुधारणा करा, कायद्याचा गैरवापर करुन मानसिक छळ करणाऱ्यांना कठोर दंड करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक
शेतमालास योग्य तो सन्मानपूर्वक भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू करा.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरसकट शासकीय मदत करावी व या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.
मराठा समाजाला शिक्षण व रोजगार क्षेत्रात त्वरित आरक्षण द्या.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरावर किमान दोन हजार विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह शासनाच्या स्वतंत्र विभागाकडून उभारण्यात यावे व चालविण्यात यावे.
शासनाच्या रोजगार वा उच्च शिक्षण विभागामार्फत मराठा युवकांकरिता स्वतंत्र स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात व चालविण्यात यावे.
मराठा समाजाच्या महानायकाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व अशी बदनामी करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचे उदात्तीकरण शासनाने थांबवावे.अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. या निवेदनावर तेजस्विनी चौधरी, शिवाणी चव्हाण, सावी बंड, अवंती चौधरी, साक्षी मुंढे, भक्ती तेटू, स्वामिनी वऱ्हाडे, आकांक्षा सोनवणे या युवतीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

‘ड्रोन’मधून पुष्पवृष्टी
नेहरु मैदानातून निघालेला मराठा समाजाचा मूकमोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात स्थिरावला. चहुबाजुने गर्दीच गर्दी अन् भगवामय वातावरण निर्माण झाले होते. या मोर्चावर ड्रोन कॅमेरातून मोर्चावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा प्रसंग टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे, मोबाईल आकाशाच्या दिशेने सरसावले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आलेले निवेदन मोर्चाच्या समारोपाच्यावेळी वाचून दाखविण्यात आले. विराट गर्दीमुळे गर्ल्स हायस्कूल चौक तुंबला होता. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचे पूजन करून काश्मिरातील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली. मात्र, मोर्चावर ‘ड्रोन’मधून झालेली पुष्पवृष्टी ही आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

मोर्चासोबतच स्वच्छता,
शहराच्या इतिहासात प्रथम
मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाऊचचे स्टॉल लावण्यात आले होते. हे रिकामे पाऊच स्वयंसेवकांनी त्वरित गोळा केले. तिवसा तालुक्याच्यावतीने अनेक ट्रॅक्टर ट्रॉली या कामी होत्या. तासभऱ्यात पाण्याच्या बॉटल व रिकामे पाऊच उचलून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोर्चानंतर स्वच्छता ही अमरावतीकरांनी प्रथमच अनुभवली .अगदी तासभऱ्यात शहर स्वच्छ करण्यात आले. सर्वसामान्य मराठे,स्वयंसेवक आणि महापालिका यंत्रणेने दोन तासात शहर स्वच्छ क ेले.

Web Title: The request for the government of Jijau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.