‘त्या’ मृत घुबड, कावळे, कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:14+5:302021-01-15T04:12:14+5:30
अमरावती : जिल्ह्यात गत पाच दिवसांपूर्वी दगावलेले कावळे, घुबड आणि कोंबड्यांचे एकूण नऊही चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती महापालिका ...

‘त्या’ मृत घुबड, कावळे, कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात गत पाच दिवसांपूर्वी दगावलेले कावळे, घुबड आणि कोंबड्यांचे एकूण नऊही चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती महापालिका पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी दिली.
पुणे येथील शासकीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेनेतून यास्ंदर्भात गुरुवारी अहवाल प्राप्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरणामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका असल्याबाबत जिल्हाभरात ‘अलर्ट’ जारी केले होते. त्यानुसार गत पाच दिवसांपूर्वी मृत कावळे, घुबड आणि कोंबड्यांच्या नमुने चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा कायम होती. मात्र, गुरुवारी अहवाल निगेटिव्ह आल्याने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बडनेरा जुनी वस्तीच्या दत्तविहार भागात २९ गावरान कोंबड्या तर, धारणी येथे तीन कावळे आणि अचलपूर वनविभागात एक घुबड दगावले होते. अचानक पक्षी दगावत असल्याने गत काही दिवसांपासून पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला होता. मात्र, चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आता पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महसूल, वन आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा अहवालाबाबत समाधान व्यक्त केले.