संशयित वस्तू आढळल्यास कळवा पोलिसांना
By Admin | Updated: August 10, 2016 23:57 IST2016-08-10T23:57:54+5:302016-08-10T23:57:54+5:30
इस्लामी स्टेट आॅफ इराक अॅन्ड सिरीया (इसिस) या जहाल दहशदवादी संघटनेच्या बॉम्ब स्फोटाच्या धमकीनंतर शहर पोलिसांची निगराणी वाढविली आहे.

संशयित वस्तू आढळल्यास कळवा पोलिसांना
शहरात अलर्ट : इर्विन चौक, रेल्वेस्थानकाची तपासणी
अमरावती : इस्लामी स्टेट आॅफ इराक अॅन्ड सिरीया (इसिस) या जहाल दहशदवादी संघटनेच्या बॉम्ब स्फोटाच्या धमकीनंतर शहर पोलिसांची निगराणी वाढविली आहे.
मंगळवारी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याजवळील परिसर, अमरावती रेल्वे स्थानक व चांगापूर मंदीराची तपासणी केली. शहरात कोठेही संशयीत वस्तु आढळून आल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इसिसच्या दहशदवादी संघटनेच्या धमकीनंतर गुप्तचर विभागाने राज्यभर अलर्ट जारी केला. त्या पार्श्वभुमिवर शहर पोलिसांनी शहरात गस्त वाढवून चौकस नजर ठेवली आहे. बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी कार्याला वेग आला आहे.