रेड्डी, विनोदकुमार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:42+5:302021-04-06T04:12:42+5:30

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण, महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना आक्रमक अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली ...

Report murder to Reddy, Vinodkumar | रेड्डी, विनोदकुमार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा

रेड्डी, विनोदकुमार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण, महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना आक्रमक

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोषी असलेले निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर खुनाचे गुन्हे नोंदवा, आठ दिवसांत गुन्हे नोंदविले गेले नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू साळुंके यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेतून दिला आहे.

दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला प्रमुख दोषी असलेले विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली. मात्र, निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर खुनाचे गुन्हे का नोंदविले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. रेड्डी याला वाचविण्यासाठी काही अधिकारी, राजकीय लॉबी सक्रिय असल्याचा आक्षेप राजू सांळुके यांनी केला. दीपाली यांनी आत्महत्या केली नसून, ती घडविण्याची स्थिती निर्माण करण्यात आली. तथापि, १३ दिवस झाले असताना, आत्महत्या करण्यास भाग पाडणारा रेड्डी अद्यापही मोकाट आहे. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरण अतिजलद न्यायालयात चालवावे, सरकारी अभियोक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, एसआयटी अथवा एनआयटी मार्फत विशेष सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्याचे साळुंके सांगितले. एम.एस. रेड्डी व विनोद शिवकुमार यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३५४, २९४, ५०६, १०९, ३१३ अन्वये गुन्हे नोंदविण्याची मागणी बेलदार समाजाने केली. यावेळी संजीवकुमार जाधव, अनिल पवार, सुरेश पवार, सागर पवार, नवनाथ मोहिते, यतीन देशमुख, साईनाथ पवार आदी उपस्थित होते.

-------------

म्हणून रेड्डी, शिवकुमारने

केले त्रस्तमेळघाट व्याघ्र फाऊंडेशनच्या नावे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अपहार, भ्रष्टाचार झाला. हा प्रकार बाहेर पडू नये, यासाठी एम.एस. रेड्डी, विनोद शिवकुमार यांनी दीपाली चव्हाण यांना त्रास दिला. एनटीसीए, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची नियमावली गुंडाळण्यात आली. भ्रष्टाचार दडपण्यासाठी दीपाली चव्हाण यांना त्रास देण्यात आला. त्यांच्यावर ॲट्राॅसिटी गुन्हे दाखल करण्यामागे मास्टर माईंड कोण, याचा शोध शासन, पोलीस यंत्रणांनी घ्यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली.

----------------------

Web Title: Report murder to Reddy, Vinodkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.