परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गावरील भूतखोरा पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:25+5:302021-07-27T04:13:25+5:30
(फोटो कॅप्शन सेमाडोह येथील भूतखोरा पूल दुरुस्ती करीता सत्ता कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, अधिकारी उपस्थित राहून काम करून घेताना) ...

परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गावरील भूतखोरा पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात
(फोटो कॅप्शन सेमाडोह येथील भूतखोरा पूल दुरुस्ती करीता सत्ता कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, अधिकारी उपस्थित राहून काम करून घेताना)
लोकमत इम्पॅक्ट
चिखलदरा : पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसात खचलेल्या परतवाडा-इंदूर आंतरराज्य मार्गावरील सेमाडोह येथील भूतखोऱ्याच्या पुलाच्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. रविवारी दोन्हीकडील वाहतूक एक तास थांबवून काम करण्यात आले. यासंदर्भात सर्वप्रथम लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
मेळघाटात झालेल्या ढगफुटीचा फटका आदिवासी पाड्यांपर्यंत वाहन पोहचवणाऱ्या अनेक रस्त्यांना बसला आहे. पावसाने परतवाडा-धारणी-इंदूर आंतरराज्य महामार्गावर असलेले लहान-मोठे सर्वच पूल ओसांडून वाहत नदी-नाल्यांना पूर होता. त्यामुळे दगड-धोंडे आणि लाकडे पात्रातून वाहून आली. अनेक ठिकाणी दरड कोसळून मलबा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला पूर्णत: अडथळा निर्माण झाला होता. चार दिवसांपासून मेळघाटात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग हा मलबा हटविण्यासह अजून कुठे काय नुकसान झाले, याची पाहणी करीत आहे.
बॉक्स
भूतखोरा पुलावर वाहतूक बंद करून काम
सेमाडोह येथील भूतखोरा पुलाची कडा कोसळल्याने त्याचा फटका मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या जड वाहतुकीसह प्रवासी वाहनांना बसला आहे. पूल धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रविवारी एक ते दीड तास दोन्ही कडील वाहतूक थांबवून खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात झाली. अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, धारणीचे उपविभागीय अभियंता तुषार काळे, शाखा अभियंता विशाल लेंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
काँक्रीट भिंती उभारून सुरक्षा
भूतखोरा नाला येथील जुना फुल खचल्यामुळे तेथे काँक्रीट भिंत उभारण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. रविवारी जवळपास अर्धे दुरुस्तीचे काम करण्यात आले. सोमवारीसुद्धा काम सुरू होते. यानंतर राज्य महामार्ग सुरळीत करण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
कोट
दोन्हीकडील वाहतूक एक तास थांबवून रविवारी व सोमवारी दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. आंतरराज्य महामार्ग असल्याने तात्काळ दक्षता घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे.
- विशाल लेंगरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखलदरा
260721\img-20210725-wa0136.jpg
पूल दुरुस्तीचे काम स्वतःच्या उपस्थित करून घेताना कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे