तिवसा-अमरावती जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे पुनर्गठन
By Admin | Updated: January 14, 2016 00:15 IST2016-01-14T00:15:32+5:302016-01-14T00:15:32+5:30
जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे.

तिवसा-अमरावती जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे पुनर्गठन
जिल्हा परिषदेचा निर्णय : सर्वसाधारण सभेत ठराव पारित
अमरावती : जिल्हा परिषद सिंचन उपविभाग तिवसा आणि अमरावती उपविभागाच्या कार्यक्षेत्राचे नव्याने पुर्नगठण करण्याचा ठराव ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारीत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धामनगांवचा तालुक्याचा समावेश तिवसा सिंचन विभागाच्या उपविभागात होता. या ठरावा प्रमाणे चांदुर रेल्वे येथे नव्याने सिंचन विभागाचा उपविभाग सुरू करण्याचा ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे.
सध्या सिंचन विभागाचे ५ उपविभाग आहेत. १२ जानेवारी रोजी पारीत करण्यात आलेल्या ठरावानुसार जिल्हा परिषद अंर्तगत तिवसा हा तालुका भातकुली या महसुली विभागाला जोडला आहे. तसेच जिल्हा परिषद सिंचन उपविभागा तिवसा अंतर्गत चांदुर रेल्वे, धामनगांव रेल्वे, ही तिन तालुके येतात. अमरावती व भातकुली तालुक्यातील बराचसा भाग हा भौगोलिक दुष्टया तिवसा विधानसभा क्षेत्राला जोडलेला आहे. सिंचन उपविभाग अमरावती अंतर्गत भातकुली अमरावती व नांदगांव खंडेश्र्वर ही तिन तालुके येतात चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर हा महसुली विभाग एक असून या तालुक्याचे विधानसभा क्षेत्र सुध्दा एकच आहे.त्यामुळे सिंचन विभाग उपविभाग हे उपविभाग चांदुर रेल्वे येथे स्थापित करूण सिंचन उपविभाग चांदुर रेल्वे अंतर्गत चांदुर रेल्वे , धामणगांव रेल्वे, व नांदगाव खंडेश्र्वर ही ३ तालुके जोडण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंगवी यांनी सर्वसाधारण सभेत मांडला या प्रस्तावास प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील उमेश केने, रंजना उईके, ज्योती आरेकर, आदीनी अनुमोदन दिले.आणि हा ठराव आवाजी मताने पारीत केला आहे. याला बसपाचे सदस्य अभिजित ढेपे यांनी मात्र विरोध दर्शविला मात्र याला न जूमानता हा ठराव पारीत झाल्याचे पीठासिन सभापती सतिश उईके यांनी जाहीर केले.