दीड कोटींतून आगाराचे नूतनीकरण

By Admin | Updated: June 27, 2016 00:12 IST2016-06-27T00:12:38+5:302016-06-27T00:12:38+5:30

स्थानिक बस आगाराकरिता दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आगारात सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

Renovation of the premises from one and a half crore | दीड कोटींतून आगाराचे नूतनीकरण

दीड कोटींतून आगाराचे नूतनीकरण

बच्चू कडूंचे प्रयत्न : प्रवाशांच्या सोयी, सुविधांना प्राधान्य
चांदूरबाजार : स्थानिक बस आगाराकरिता दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आगारात सौंदर्यीकरण केले जाणार आहे. हा निधी मंजुरीसाठी आ.बच्चू कडू यांनी पाठपुरावा केल्याने यश आले आहे.
अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेला चांदूरबाजार बस आगार दुरवस्थेत होता. याची गंभीर दखल घेत आ.बच्चू कडू यांनी विधी मंडळात आगारातील दुरवस्था प्रभावीपणे मांडली. त्यामुळे चांदूर बाजार आगाराच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला. याकरिता आ.कडू यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह बैठक घेऊन होणाऱ्या विविध विकासकामाचे मार्गदर्शन केले. यामध्ये आगारामध्ये विद्यार्थ्यांना पास काढण्याकरिता काचेचे स्वतंत्र कक्ष उभारणी करणे, आगाराचा देखरेखी करिता आगार व्यवस्थापकाची दर्शनी भागात कक्षाची उभारणी करणे, पिण्याचा पाण्याची व्यवस्था, रोगराई, बैठक व्यवस्था, शिदोरी गृह, प्रतिक्षालयसह आगाराला अतिरिक्त प्रवेशद्वार उभारणी आधुनिक शौचालयाची उभारणी असण्याबाबत आदेश दिले.

चालक-वाहकांनी मांडल्या समस्या
दीड कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने आगारात उपस्थित एसटी चालक मो.शफी यांनी शिदोरीगृह व प्रतिक्षालय उभारण्यासंबंधीची मागणी केली. तसेच प्रसाधनगृह, सांडपाणी, पिण्याचा पाण्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याची व्यथा उपस्थित नागरिकांनी मांडल्या.

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
आ.कडू यांचा संकल्पनेतून चांदूर आगाराचा कायापालट होणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सोयी, सुविधांवर लक्ष राहणा आहे. आधुनिक सांधनाचा वापर करुन स्वच्छतेवर लक्ष ठेवले जाईल. सौंदर्यीकरणाकरिता निधीची कमतरता पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Renovation of the premises from one and a half crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.