समस्या निकाली काढणार
By Admin | Updated: May 28, 2017 00:14 IST2017-05-28T00:14:10+5:302017-05-28T00:14:10+5:30
शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

समस्या निकाली काढणार
शिवार सवांद यात्रा : अनिल बोंडे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असे प्रतिपादन आ.अनिल बोंडे यांनी केले.
तालुक्यातील अंबाडा जि.प. सर्कलमध्ये शिवार संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाला गावकऱ्याची बहुसंख्येन उपस्थिती होती. यावेळी पं.स.सदस्य रमेश खातदेव, अंबाडाचे सरपंचा सुलोचना कंगाले मुरलीधर पिसे, जुबेर पटेल, दीपक घाटोळ, रवी कोकरे आदी उपस्थित होते.
चिंचोली गवळी येथे आमदार बोंडे यांनी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दजेर्दार बी-बियाणे पुरविणे, कृषीकर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी सविस्तर सवांद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती - समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलेले आहे, असे सांगितले.
यावेळी सरपंचा सुनिता धुर्वे, सुरेशआप्पा चौधरी, वसुधा बोंडे, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शिवेंद्रसिंग किल्लेदार, उत्तमराव चचाने, पकळे महाराज, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव येवले, सुभाष ठाकरे, घनश्याम तागडे यांच्यासह आदी उपस्थित होते.