रेमेडीसिवीरचा तुटवडा, कोरोनाशी कसे लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:13+5:302021-04-12T04:12:13+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संसर्गात गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘रेमेडीसीविर’ इंजेक्शनचा या चार दिवसांत तुटवडा निर्माण झालेला आहे. ...

Remedicivir shortage, how to fight corona? | रेमेडीसिवीरचा तुटवडा, कोरोनाशी कसे लढणार?

रेमेडीसिवीरचा तुटवडा, कोरोनाशी कसे लढणार?

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संसर्गात गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘रेमेडीसीविर’ इंजेक्शनचा या चार दिवसांत तुटवडा निर्माण झालेला आहे. शासकीय रुग्णालयांत उपलब्ध असले तरी खासगीत मात्र, मोठी किंमत मोजावी लागत आहे. मागणीनंतर पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याने कोरोनाशी कसे लढणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे व अशा प्रतिकुल परिस्थितीत’ब्लॅक मार्केटिंग’मधून वाटेल ती किंमत मोजून रुग्णाचा जीव वाचिवण्याचा प्रयत्न नातेवाईक करीत आहे.

अन्न व औषधी विभागाच्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालात ७५०० व खासगीत २०० रेमेडीसीवीर उपलब्ध असल्याचे असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. मात्र, या इंजेक्शनचा उपयोग होत असल्याने सध्या चार हजार व्हायल उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्याही कमी झालेला नाही. रोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. यात किमान ८ ते १० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत असतात. यापैकी काही खासगी रुग्णालयांत तर काही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होतात. जिल्ह्यात २३ डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल आहेत. या रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमेडीसीविर विक्रीला असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील रुग्णदेखील येथील डीसीएच सुविधेत उपचारार्थ दाखल होत असल्याने या इंजेक्शनची वाढती मागणी वाढली व त्यातुलनेत पुरवठा होत नसल्यानेच आता चढ्या भावाने विक्री होत असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.

या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाने जिल्हा स्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समिती सदस्यांनी शनिवारी काही रुग्णालय व मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली. याशिवाय केंद्रीय आरोग्य पथकाने रेमेडिसीविरचा काळाबाजार होऊ नये, अशी तंबी दिल्याने या स्थितीचे गांभीर्य वाढले आहे.

बॉक्स

‘रेमेडीसीविर’ची उसनवार

सध्या रेमेडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने मिळेल तेथून व्हायल मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहे. शासकीय रुग्णालयांना हॉफकिन इन्सीट्युटमधून पुरवठा होत असल्याने तुटवडा नाही. सध्या चार हजार व्हायल उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील पीडीएमएमसी रुग्णालयाद्वारा सुपरस्पेशालिटीमधून ४०० व्हायल उसनवार पद्धतीने देण्यात आलेले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात रोज १५० ते १७५ दरम्यान हे इंजेक्शनचा उपचारासाठी वापर होत असल्याचे ते म्हणाले.

बॉक्स

२३ खासगी रुग्णालयांना २०० व्हायल कसे पुरणार?

एफडीएच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील २३ खासगी रुग्णालयांसाठी २०० व्हायल उपलव्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या रुग्णालयात सध्या आयसीयूमध्ये २३६, ऑक्सिजन बेडवर २३८ व व्हेंटीलेटरवर ३८ रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या गाईडलाईननुसारही वापर केला तरी एवढा साठा पुरेसा नाही. विविध कंपन्यांचे इंजेक्शन १८०० ते २२०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

अन्य जिल्ह्याचे रुग्ण उपचारार्थ अमरावतीत

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात सध्या नागपूर, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यातील रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील रुग्णालये फुल्ल झालेली आहे. त्यामुळे अधिकतम रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. गंभीर अवस्थेतील या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक वाटेल ती किंमत मोजावयास तयार असल्याने या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

जिल्ह्यात पाच कंपन्यांचा पुरवठा

जिल्ह्यात सध्या झायडस, हेटेरो, मायलॉन, सिपला व ज्युबिलॉन या पाच कंपन्यांद्वारा पुरवठा होतो. शासकीय रुग्णालयांत हॉफकिनद्वारे पुरवठा होत आहे. या पाचही कंपनींच्या रेमेडिसिविरचे दरमात्र, वेगवेगळे आहे. मागील आठवड्यात हेटेरोद्वारा ४०० व्हायलाचा पुरवठा करण्यात आला होता. रविवारी पुन्हा पुरवठा होणार होता. मात्र, स्टाॅकिस्टकडे माल नसल्याने नकार दर्शविण्यात आला. आता प्रतीक्षा असल्याचे एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले.

कोट

शासकीय रुग्णालयात रेमेडिसिविरचा वापर प्रोटोकॉलनुसार होतो. सध्या चार हजार व्हायलचा साठा रुग्णासाठी पुरेसा आहे. जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पीडीएमसीला उसनवार पद्धतीने ४०० व्हायल दिले आहेत.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

सध्या रेमेडिसिविरचे २०० व्हायल उपलब्ध आहेत व तेदेखील खासगी किविड रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे चढ्या भावाने विक्रीची शक्यता नाही, आमचा वॉच आहे.

- मनीष गोतमारे,

औषधी निरीक्षक, एफडीए

कोट

जिल्हधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत प्रोटोकॉलनुसार व फाॅर्म भरल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. शासकीय रुग्णालयातूनही आवश्यकतेनुसार उसणवार घेण्याच्या सूचना आहेत

- डॉ अनिल रोहनकर,

श्वसन विकारतज्ज्ञ

Web Title: Remedicivir shortage, how to fight corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.