रमाई आवास योजनेतील अटी, शर्ती शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:42+5:302021-07-05T04:09:42+5:30
प्रवीण पोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, अविवाहितांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा अमरावती : अनुसूचित जाती संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पात्र ...

रमाई आवास योजनेतील अटी, शर्ती शिथिल करा
प्रवीण पोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, अविवाहितांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा
अमरावती : अनुसूचित जाती संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थींना रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा, या योजेनची व्याप्ती वाढवावी आणि अविवाहितांना लाभ देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांनी नुकतेच दिले आहे.
‘लोकमत’ने २४ जून रोजी ‘अविवाहितांना रमाई आवासचा लाभ नाही’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आमदार पोटे यांनी राज्य शासनाला रमाई आवास योजनेतील अटी, शर्ती शिथिल करण्याची मागणी केली आहे. अमरावती महानगरात रमाई आवास योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, अविवाहित असल्याने त्यांना लाभ मिळू शकत नाही. दुसरीकडे राज्य शासनाने रमाई आवास योजना ही केवळ विवाहितांनाच लागू असल्याचा शासनादेश जारी केला आहे. त्यामुळे अमरावती व बडनेरा शहरातील अनुसूचित जाती संवर्गातील अनेक पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित असल्याची कैफियत आमदार पोटे यांनी मांडली आहे. महापालिकेने याविषयी ठरावदेखील मंजूर केल्याने आमदार पोटे यांनी नमूद केले आहे.