लाॅकडाउन शिथिल करा,अन्यथा शुक्रवारपासून दुकानांचे शटर उघडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:08+5:302021-04-08T04:14:08+5:30

अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन तात्काळ ...

Relax the lockdown, otherwise the shutters of the shops will open from Friday | लाॅकडाउन शिथिल करा,अन्यथा शुक्रवारपासून दुकानांचे शटर उघडू

लाॅकडाउन शिथिल करा,अन्यथा शुक्रवारपासून दुकानांचे शटर उघडू

अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन तात्काळ शिथिल करावा, अन्यथा शुक्रवार, ९ एप्रिलपासून दुकानाचे शटर उघडू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदनाद्वारे दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लावण्यात आलेला हा तिसरा लॉकडाऊन आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अमरावतीमधील उद्योगधंदे, व्यापार हॉटेल, रेस्टॉरेन्ट चौपट झाले आहेत. त्यामुळे कामगार, गरिबांवर तसेच ज्याचा उदरनिर्वाह मजुरीवर आहे. अशांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच अमरावतीमध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाली. त्यावेळी १००० च्या जवळपास रुग्ण निघत होते. परंतु, आता रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता नव्हती, असे भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोबतच लाॅकडाऊनविरोधात सर्वत्र असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील लाॅकडाऊन तातडीने शिथिल करावा, अन्यथा शुक्रवार, ९ एप्रिल रोजी अमरावतीमध्ये दुकानांची शटर उघडू. याकरिता व्यापाऱ्याच्या पाठीशी भाजपाचे कार्यकर्ते उभे राहून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा भाजपाचे नेते माजी आ. सुनील देशमुख, आ. प्रवीण पोटे पाटील, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, शहराध्यक्ष किरण पातूरकर, शिवराय कुलकर्णी, रवींद्र खांडेकर, खांडेकर, कुसून साहू, सचिन रासने, राजेश आखेगावकर, गजानन देशमुख, मंगेश खोंड, रविकिरण वाघमारे, योगेश वानखडे, आत्माराम पुरसवाणी, बकुल कक्कड, संजय आठवले, सुमित कलाणे, सारंग राऊत, प्रणीत सोनी, राजेश बत्रा, रश्मी नावंदर, राजेश गोयंका, जितेश भुजबळ, तुलसीदार साधवानी, रवींद्रसिंग सलूजा, विश्वनाथ अरोरा, उषा भुतडा, प्रतिभा भोवते, वैशाली बोंडे, स्वाती अडगुलवार, शेखर कुलकर्णी, हेमंत श्रीवास, विशाल डहाके, प्रवीण वैश्य आदींनी दिला आहे.

Web Title: Relax the lockdown, otherwise the shutters of the shops will open from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.