प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीशी संबंध
By Admin | Updated: September 9, 2014 23:08 IST2014-09-09T23:08:52+5:302014-09-09T23:08:52+5:30
शिकारी पक्ष्यांची ओळख ही त्याच्या पंखाखालील विशीष्ट आकृतिबंधाद्वारे केली जाते. त्यामुळे हे गिधाड असल्याचे दोघांच्याही निर्देशनास आले. हा पक्षी गिधाड आहे याची खात्री पटविण्याकरिता त्यांनी

प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीशी संबंध
अमरावती : शिकारी पक्ष्यांची ओळख ही त्याच्या पंखाखालील विशीष्ट आकृतिबंधाद्वारे केली जाते. त्यामुळे हे गिधाड असल्याचे दोघांच्याही निर्देशनास आले. हा पक्षी गिधाड आहे याची खात्री पटविण्याकरिता त्यांनी छायाचित्राची प्रत विविध आंतर राष्ट्रीय संस्था आणि पक्षी तज्ज्ञांकडे पाठविली. त्यामध्ये बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी आणि रागु राव (इंडिया नेचर वॉच, म्हैसूर) यांनी तो पक्षी गिधाड प्रजातीमधील मिस्त्री गिधाड असल्याची पुष्टी केली. अशा अतिदुर्मीळ पक्ष्यांची नोंद अमरावतीमध्ये झाल्याने जिल्ह्या तील पर्यावरण समृध्द आहे, असे म्हटले जावू शकते. मिस्त्री गिधाडाची नोंद घेण्याकरिता वन्यजीव अभ्यासक रघू राव, अहसान शेख, मनोज बिंड यांनी जगंलात भ्रमंती केली आहे.
गिधाड पक्षी हा प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीत पुज्य होती. ती ईसस देवी तसेच राजपदाचे प्रतीक होते. या प्रजातीला इंग्रजीत ईजिप्शीयन व्हल्चर असे नाव मिळाले. आज जागतिक स्तरावर गिधाडे नामशेष होत आहेत. इंटरनॅशनल युनियन कन्झरर्वेशन फॉर नेचर या आंतरराष्ट्रीय प्रणालीने गिधाडाचा समावेश एनडेन्जर्ड गटात केलेला आहे. अशी माहिती क्रिष्णा खान यांनी दिली.
९९.९ टक्के गिधाडे भारतातून नामशेष
भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणात २००३ पर्यंत ९५ टक्के तर २००९ पर्यंत ९९.९ टक्के गिधाडे भारतातुन नामशेष झाल्याचे सिध्द झाले आहेत. १९९९ नंतर गिधाडाच्या संख्येत दरवर्षी ३५ टक्याने घट होत आहे. कसंबे यांनी २००७ साली लिहिलेल्या एका संशोधनात जिल्ह्यात शेवटचे मिस्त्री गिधाड २००३ मध्ये पाहिल्याचे नमूद आहे.
एका दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास
मिस्त्री गिधाडचे शास्त्रीय नाव नेफ्रॉन परनॉप्टेरॉस असून जगभरात याच्या तीन उपजाती आढळतात. त्यापैकी भारतीय उपखडात जिन्जीनियास ही उपजात आढळते. मिस्त्री गिधाडाचे वयोमान २१ ते ३७ वर्ष असू शकते. तसेच गिधाड एका दीवसात ५०० किलोमीटर उडु शकतात. हे संशोधनातून सिध्द झाले आहे.