फेरमतमोजणीचे अपील फेटाळले

By Admin | Updated: October 7, 2015 01:32 IST2015-10-07T01:32:28+5:302015-10-07T01:32:28+5:30

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी पडलेल्या मतांची फेरतपासणी करण्यात यावी, ....

The rejection of the referendum dismissed | फेरमतमोजणीचे अपील फेटाळले

फेरमतमोजणीचे अपील फेटाळले

अमरावती बाजार समिती : विकास इंगोले यांचे संचालकपद कायम
अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील एका जागेसाठी पडलेल्या मतांची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारे अपिल जिल्हाधिाकाऱ्यांनी फेटाळले आहे व त्याचबरोबर १६ सप्टेंबरला जाहीर केलेला निकाल कायम करण्यात आला आहे. त्यामुळे विकास जगन्नाथ इंगोले यांचे संचालकपद कायम राहिले आहे.
गेल्या १५ सप्टेंबरला १८ सदस्यीय अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात सेवा सहकारी संस्था (इमर मागासवर्गीय) मतदारसंघामधून विकास जगन्नाथ इंगोले ३६५ मते पडली. इंगोले यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र त्यानंतर पराभूत उमेदवार भय्यासाहेब निर्मळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरतपासणीबाबत अर्ज दाखल केला. यात निवडणूक निर्णय अधिकारी, विकास इंगोले व निलेश मानकर यांना प्रतिवादी करण्यात आले. या मतदारसंघात १०४ मते अवैध ठरली. अवैध मतांमध्ये भैय्यसाहेब निर्मळ यांच्या नावासमोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरविण्यात आलेली बाणफुली मारण्यात आली असून त्यामध्येच काही मतदारांनी मतपत्रिकेवर अंगठा, काही मतपत्रिकेवर बरोबर अशा खुना केल्या आहेत. अशा मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविल्या. अशा खुणेमुळे त्या मतपत्रिकेवरुन मतदारांनी ओळख होत नसल्याने फेरमतमोजणी करण्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद नाकारुन जिल्हाधिकाऱ्यांनी विकास इंगोले यांचे संचालकपद कायम ठेवले आहे.
मतमोजणीच्या दिवशी निर्मळ यांनी मतमोजणी लेखी अथवा तोंडी आक्षेप नोंदविला नाही. त्यासाठी निर्मळ यांच्याकडे पुरेसा अवधी सुद्धा होता. मात्र त्यानंतरही कुठलाही आक्षेप न आल्याने मतमोजणीची प्रक्रिया नियमसंगत असल्याचे आपले मत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांचा लेखी जबाब सुद्धा नोंदविण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी निर्मळ यांनी कोणताही आक्षेप न नोंदविल्याने त्यांचा अपिल नामंजुर करण्यात येत आहे व त्याचबरोबर इंगोले यांना विजयी ठेवण्याचा १६ सप्टेंबरचा निकाल कायम करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
सेवा सहकारी संस्था (इतर मागासवर्गीय) मतदार संघामध्ये वैध मतांची संख्या ९०७, अवैध मतांची संख्या १०४ होती. वैध मतांपैकी विकास इंगोले यांना ३६५ आणि भैय्यासाहेब निर्मळ यांना ३४८ मते पडली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: The rejection of the referendum dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.