जिल्ह्यात २६९ रुग्णालयांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:52+5:302021-01-19T04:15:52+5:30
बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक अमरावती : बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेकडून प्राप्त ...

जिल्ह्यात २६९ रुग्णालयांची नोंदणी
बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक
अमरावती : बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार नगर परिषद क्षेत्रात ४१ व ग्रामीण भागात १८ अशा ५९ रुग्णालयांची नोंदणी झाली आहे. महापालिका क्षेत्रात २१० खासगी रुग्णालयांची नोंद झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या रुग्णालयांना नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. आरोग्य विभागाच्या विविध पथकामार्फत वेळोवेळी रुग्णालयांना भेट देऊन तपासणी केली जाते. त्या तपासणीत कोणी नोंदणी न करताच रुग्ण सेवा देत असल्याचे दिसून आले. अशा डॉक्टरांवर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाते किंवा परवाना रद्दची कारवाई होऊ शकते.
बॉक्स
नोंदणीसाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव
रुग्णालयांना तीन वर्षांनंतर नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. कोरोना काळातही ज्यांनी नोंदणीसाठी प्रस्ताव दिले त्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
बॉक्स
नोंदणी न केल्यास होणार कारवाई
बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार डॉक्टरांना आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी नसेल तर प्रथमत: नोटीस दिली जाते. त्यानंतर दंडात्मक कारवाई होते. तरीही नोंदणी होत नसेल तर संबंधितांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.
बॉक्स
ग्रामीण भागाची स्थिती
अमरावती ५, भातकुली २, दर्यापूर ३, अंजनगाव सुर्जी ५, अचलपूर १४, चांदूरबाजार १, धारणी १, चिखलदरा ०, वरुड १३, मोर्शी ६, तिवसा ४, नांदगाव खंडेश्वर १ धामणगाव रेल्वे १ चांदुर रेल्वे १
बॉक्स
जिल्ह्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालय २६९
कोट
नोंदणी शिवाय रुग्णालय चालवता येत नाही
बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार रुग्णालयाची नोंदणी करूनच रुग्णांना सेवा देता येते. रुग्णालयाची वेळोवेळी तपासणी करून नोंदणीबाबत सूचना दिल्या जातात. मात्र, ज्या रुग्णालयाची नोंदणी केली नसल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी