शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी १६ लाख शेतक-यांची नोंदणी,  ८ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाईन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:29 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

अमरावती, दि. 14 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात आपले सरकार पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे. अद्याप तीन लाख शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी असल्याने योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.योजनेची १५ सप्टेंबर ही 'डेडलाईन' आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इटंरनेटची समस्या असल्याने योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतरच्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरूवातीपासूनच योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही, बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य. आॅनलाईन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी एक दिवसच मुदत शिल्लक असल्याने योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे

बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २.१६ लाख अर्जअमरावती विभागात १५ लाख ६० हजार शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४,२२,०६४ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली. २,१६,३२६ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात २,२१,३४३ नोंदणी व १,१२,८८१ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,२९,२०९, शेतक-यांची नोंदणी व १,४२,६८५ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात २,१८,८९७ शेतक-यांची नोंदणी व १,०६,५६९ अर्ज भरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४,०५,०३८ शेतक-यांची नोंदणी व २,०३,२६० शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी