शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST

दोन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन, तीन महिन्यानंतरही प्रशासकीय प्रवास सुरूच अमरावती : आदिवासी समाजासाठी मंजूर केलेल्या ...

दोन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन, तीन महिन्यानंतरही प्रशासकीय प्रवास सुरूच

अमरावती : आदिवासी समाजासाठी मंजूर केलेल्या खावटी अनुदान योजनेसाठी आता पोर्टलवर नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्याकरिता ‘ट्रायबल’ने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, नोंदणीशिवाय अनुदान नाही, अशी नवी नियमावली आहे. मात्र, खावटी अनुदानासाठी लाभार्थी जास्त आणि लक्ष्यांक कमी असल्यामुळे आदिवासी विकास विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने कोरोना संकटातून काहीअंशी मुक्तता मिळावी, यासाठी आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली. यासंदर्भात ९ सप्टेंबर रोजी शासनादेश निर्गमित झाला, तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी ३० सप्टेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनेत सातत्याने बदल होत असल्याने खावटी अनुदान मिळणार की नाही, याबाबत आदिवासी समाजात संभ्रम कायम आहे. खावटीचे दोन हजार रुपये आदिवासींना खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्प स्तरावर आदिवासींनी खावटीसाठी दिलेल्या अर्जाचा आधार घेत पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे, यात जनगणनेची आकडेवारी, मनरेगा लाभार्थी, आदिम जमात, पारधी व वैयक्तिक वनहक्कधारक अशा पाच प्रकारच्या लाभार्थ्यांना ‘खावटी’चा लाभ मिळणार आहे. यात दोन हजार रुपये खात्यात आणि दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहे. त्याअनुषंगाने समिती गठित करण्यात आली आहे.

------------------------------------

पात्र लाभार्थी संख्येत वाढ, प्रशासन हैराण

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. परंतु, लाभार्थी संख्येचा लक्ष्यांक मर्यादित असल्याने अमरावती, नाशिक, ठाणे व नागपूर अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत पात्र लाभार्थी निश्चित करणे प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरत आहे. राज्यभरात खावटीचे ११ लाख ५५ हजार आदिवासी लाभार्थी निश्चित करण्यात आले असले तरी २५ लाखांच्यावर लाभार्थी असल्याची माहिती आहे. त्यामुळे खावटी अनुदानावरून वादाची ठिणगी उडण्याचे संकेत आहे.

कोट

अमरावती विभागांतर्गत पांढरकवडा, धारणी व किनवट प्रकल्प स्तरावर चार लाखांच्यावर खावटी अनुदानाचे लाभार्थी आहेत. शासनाने १.९० लाख लाभार्थी लक्ष्यांक दिले असून, आतापर्यंत ५३ हजार पात्र उमेदवारांची पोर्टलवर नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपये खात्यात जमा होतील. लाभार्थी संख्येत वाढ करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती.