वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार
By Admin | Updated: December 14, 2015 00:11 IST2015-12-14T00:11:34+5:302015-12-14T00:11:34+5:30
तालुक्यातील कुरळपूर्णा मौजातील शेतकऱ्यांचा शेतातून विहीरीवरुन तसेच बांधकाम सुरू असलेल्या घरावरून हेतुपुरस्पर विद्युत मुख्य वाहीनी टाकल्याने वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार समोर आला आहे.

वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार
शेतकऱ्याची तक्रार : बांधकाम सुरू असलेल्या घरावरून गेली विद्युत जोडणी
सुमित हरकुट चांदूरबाजार
तालुक्यातील कुरळपूर्णा मौजातील शेतकऱ्यांचा शेतातून विहीरीवरुन तसेच बांधकाम सुरू असलेल्या घरावरून हेतुपुरस्पर विद्युत मुख्य वाहीनी टाकल्याने वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार समोर आला आहे.
विद्युत वितरण कंपनीतर्फे तालुक्यात शेतशिवीरात विद्युत खांब उभारुन विद्युत जोडणी देण्याचे कामे झपाट्याने सुरू आहे. या सर्व कामाकरिता कंपनीतर्फे कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या कामावर कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने या कामात मोठे गैरप्रकार होत असल्याचा अनेक तक्रारी आहे.
असाच एक प्रकार तालुक्यातील मौजा कुरळपूर्णा येथे घडला. या शेतशिवारात सर्वे नंबर २८६ हे प्रवीण मनोहरराव मोहोड यांचे शेत आहे. यांचा शेतात एक विहीर असून शेतात एका घराचे बांधकाम सुरू आहे. तसेच यांचा नजीकच्या शेतात विद्युत जोडणी सुरू असल्याने प्रवीण मोहोड यांचा शेतातून विद्युत जोडणीचे वाहीन्या गेलेल्या आहे. मात्र संबंधित कंत्राटदारतर्फे बांधकाम सुरू असलेल्या घरावरून तसेच विहीरीवरून विद्युत वाहीन्या न टाकणे असा नियम असून सुद्धा हेतुपुरस्पर कंत्राटदारामार्फत सदर बांधकामावरून तसेच विहीरीवरून विद्युत जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवीण मोहोड यांचा शेतातील चुकीच्या विद्युत जोडणीमुळे शेतात काम करण्याचा जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकाराविषयी प्रवीण मोहोड यांनी विद्युत खांब टाकतानाच आक्षेप घेतला होता. मात्र तरीही कंत्राटदारामार्फत हेतुपुरस्पर घरावरुनच विद्युत वाहीन्या टाकण्यात आल्याने अखेर प्रवीण मोहोड यांनी या प्रकरणाची तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. या प्रकरणात कंत्राटदारातर्फे नियमबाह्य विद्युत जोडणी केली असून ती तत्काळ बदलविण्याची मागणी प्रवीण मोहोड तर्फे करण्यात आली आहे. असे अनेक प्रकारे नियमबाह्य विद्युत जोडण्या केल्याने आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांना जिव गमवावा लागला आहे. असे असून सुद्धा ही विद्युत वितरण कंपनीची कुंभकर्णी झोप उघडत नसल्याने विद्युत वितरण कंपनीही कंत्राटदारांचा हातातील कठपुतली बनलेले चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. प्रवीण मोहोड यांच्या तक्रारीनुसार त्यांचा शेतातील विद्युत जोडणी ही चुकीची करण्यात आली आहे.