रेफर रुग्णांनाही आता ‘१०८’ ची सुविधा
By Admin | Updated: May 9, 2015 00:18 IST2015-05-09T00:18:53+5:302015-05-09T00:18:53+5:30
गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी जननी शिशू योजनेंतर्गत रुग्णवाहिका .....

रेफर रुग्णांनाही आता ‘१०८’ ची सुविधा
आरोग्य उपसंचालकांची सूचना: जिल्हा रुग्णालय प्रशासन सजग
गर्भवतींनाही सुविधा
गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी जननी शिशू योजनेंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. यासोबत आता १०८ या रुग्णवाहिकाद्वारेही गर्भवती मातांना आरोग्य केंद्रात पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
रुग्ण पाठविण्याची सुविधा
रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडल्यास नागपूर, पुणे, मुंबई येथे पाठविण्याची सुविधा १०८ रुग्णवाहिकेव्दारे केली जाते. रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असावा. रेफरसाठी शल्यचिकित्सकांच्या परवानगी पत्राची आवश्यकता आहे.
रेफर रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेनेच पाठविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याला शासकीय रुग्णालयात पाठविण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे.
- अविनाश लव्हाळे,
आरोग्य उपसंचालक
या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा आहेत. सोबत तज्ज्ञदेखील असल्याने अडचण येत नाही. रुग्णांना संबंधित रुग्णालयात पोहचविण्यात येते. ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे.
- नितीन भालेराव,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.