पीक विम्याच्या हप्त्याचा भार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 00:21 IST2016-07-14T00:21:09+5:302016-07-14T00:21:09+5:30

राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करुन नवीन व्यापक स्वरुपातील प्रधानमंत्री पिक विमा योजना शासनाने जाहीर केली.

Reduce the burden of the crop insurance premium | पीक विम्याच्या हप्त्याचा भार कमी

पीक विम्याच्या हप्त्याचा भार कमी

रब्बीसाठी दीड टक्का कपात : बिगर सभासदांनाही मिळणार लाभ
अमरावती : राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करुन नवीन व्यापक स्वरुपातील प्रधानमंत्री पिक विमा योजना शासनाने जाहीर केली. यात वास्तवदर्शी दराने विमा हप्ता ठरविण्यात आला. खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दिड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के अशी मर्यादा ठेवण्यात आली. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक सहभाग आहे. कुळाने किंवा भाडे पट्टीने शेती करणारेही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतचा निर्णय संकेतस्थळावर जाहीर केला आहे. पूर्वीची विमा योजना केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेद्वारा तत्वांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येत होती. काही पिकांसाठी ही योजना मर्यादीत होत होती. कर्जदार शेतकऱ्यांशिवाय इतरांना त्याचा लाभ नव्हता या सर्व बाबी बाजूला सारत प्रधानमंत्री पिक विमा योजना व्यापक प्रमाणात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो.या योजनेचे अंतीम तारीख ३१ जूलै आहे.त्या तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी बँकेत आवश्यकती कागदपत्रे सादर करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: Reduce the burden of the crop insurance premium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.