पशु खाद्याचे दर कमी करा

By Admin | Updated: January 8, 2016 00:08 IST2016-01-08T00:08:11+5:302016-01-08T00:08:11+5:30

दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई, नापिकी वैरणाचा तुटवडा, दुधाला मिळणारा कमी दर यातच ढेप व इतर पशुखाद्यांचे वाढलेले भाव पशुपालक अडचणीत आले आहे.

Reduce animal feed prices | पशु खाद्याचे दर कमी करा

पशु खाद्याचे दर कमी करा

आंदोलन : गोधन मालक धडकले एसडीओ कार्यालयावर
चांदूररेल्वे : दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई, नापिकी वैरणाचा तुटवडा, दुधाला मिळणारा कमी दर यातच ढेप व इतर पशुखाद्यांचे वाढलेले भाव पशुपालक अडचणीत आले आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव नीलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात पशूपालक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकले.
सध्या जंगलात कोणताही चारा नसल्याने वने ओसाड पडलेली आहे. गोधण मालकांना आपली दुधाळ जनावरे ढेप तसेच इतर पशुखाद्यावरच जगवावे लागत आहे. आणि अशातच ढेपीचे भाव या आठ दिवसांतच १५ रुपये किलोवरून थेट २२ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहे. गोधण मालकांना रोजच हे खाद्य खरेदी करावे लागत आहे. एकीकडे साठेबाज या पशुखाद्याची जमाखोरी करून जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने ही भाववाढ करताना दिसत आहे. यावर शासनाचे कोणतेही अंकुश दिसत नाही. तसेच या गोधण मालकांना डेअरीमधून किंवा खासगी व्यावसायिकांकडून पुरेल तेवढा भाव मिळत नाही. यामुळे त्रस्त होऊन गुरुवारी स्थानिक गोधण मालक नीलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात पशूपालक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धडकले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच या मागण्यांचा विचार त्वरित न झाल्यास उग्रस्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.
यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांना शरद मेंढे, प्रशांत वाल्दे, तिलक कडपे, संतोष चांडोळे, सावन अहिर, दत्ता कोरडे, निखिल वाघ, किशोर खुंडे, भाष्करराव उघडे, सय्यद खालिद, अतुल बेलसरे, गौतम मेश्राम, प्रभाकर ढेपे, अतुल गोरे, शुभम कोरडे, सुरज खाडे, शेखर बेराड, अनिल मेंढे, धनराज राऊत, उमेश शेंद्रे, मंगेश खाडे, सुरज झाडे, दिलीप चौरागडे, सुनील अहिर यांच्यासह अनेक गोधण मालक यांनी निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Reduce animal feed prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.