रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, न्यायालयाचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:50+5:302021-04-08T04:13:50+5:30

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. ...

Reddy deliberately ignored, the court rebuked | रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, न्यायालयाचा ठपका

रेड्डीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, न्यायालयाचा ठपका

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना अचलपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस के. मुंनगीनवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे मारले आहेत. दीपाली प्रकरणाचा तपास करणाऱ्या अमरावती पोलिसांकडे अजूनही निकालाची प्रत पोहचलेली नाही का? की रेड्डीला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी एम. एस. रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती. रेड्डीचा अटकपूर्व जामीन नाकारताना न्या. एस. के. मुंनगीनवार यांनी रेड्डी याच्या कृतीवर गंभीर स्वरुपाचे ताशेरे ओढले आहे. दीपाली प्रकरणातील आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावर होत्या. मात्र, रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्याच्या वर्तणुकीला आळादेखील घातला नाही. दीपाली आत्महत्या प्रकरणात रेड्डी सरकारी दस्तऐवज फेरफार करू शकतात किंवा पुरावे प्रभावित करू शकतात. तपासात खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात. विनोद शिवकुमारच्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा ठपका न्या. एस. के. मुंनगीनवार यांनी ठेवला आहे. न्यायालयीन सुनावणीत ताशेरे मारले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्चपदस्थांचा रेड्डीला वाचवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्नदेखील भाजपने उपस्थित केला आहे.

----------

दीपालीच्या आईची तक्रार

दीपाली चव्हाण यांच्या आई शकुंतला चव्हाण यांनीदेखील रेड्डी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध असताना सरकार रेड्डीला का वाचवते आहे, हा प्रश्न संपूर्ण समाजाला पडला असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Reddy deliberately ignored, the court rebuked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.