शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीच्या तीरावर आकार घेत आहेत लाल मातीच्या गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 08:00 IST

Amravati News आपण प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू मातीच्या तयार केलेल्या गणपती मूर्ती बघितल्या. मात्र यंदा लाल मातीपासून विघ्नहर्त्याच्या मूर्तीचा नवा ट्रेंड दिघी महल्ले येथील कुंभार बांधवांच्या तिसऱ्या पिढीने साकारला आहे.

ठळक मुद्देया गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य घरातच विसर्जन करता येते. पाण्यात लवकर विरघळतात. पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होत नाही.मातीचा पुनर्वापर करता येईल.

मोहन राऊत 

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : आपण प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू मातीच्या तयार केलेल्या गणपती मूर्ती बघितल्या. मात्र यंदा लाल मातीपासून विघ्नहर्त्याच्या मूर्तीचा नवा ट्रेंड दिघी महल्ले येथील कुंभार बांधवांच्या तिसऱ्या पिढीने साकारला आहे.

(Red clay Ganesha idols are taking shape on the banks of river Wardha)

धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावरील अडीच हजार लोकवस्तीचे दिघी महल्ले येथे कुंभार बांधवांचे १५ ते २० कुटुंब राहतात. यातील दहा कुटुंब तीन पिढ्यांपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे काम करतात. वझे नामक कुटुंबाची तिसरी पिढी गणपतीच्या मूर्ती बनवितात. ओंकार वझे त्यांचे बंधू श्रीकृष्ण, तर जानरावनंतर आता तिसरी पिढी ओमेश वझे मातीच्या गणपती मूर्ती गणपती तयार करण्याचे काम अखंडपणे करीत आहे.

अशा होतात लाल मातीच्या मूर्ती तयार

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा विपरीत परिणाम मानवी जीवन शैलीवर होतो. शाडू मातीची किंमत अधिक आहे. त्यामुळे येथील कुंभार कुटुंबीयांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सावरगाव येथून लाल माती मार्च महिन्यात आणली. शंभर फुटाचा लाल मातीचा ट्रक नऊ हजार, तर दहा हजार रुपयांचा कलर लागतो. वझे कुटुंबीय साच्याऐवजी कलाकृतीला महत्त्व देत हातानेच मूर्ती तयार करीत आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यापासून तर रक्षाबंधनापर्यंत चालते. पावसाळ्यात मातीचा बचाव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यंदा त्यांनी ऑरेंज कलरच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गणरायाचं किरीट तेही सोनेरी आहे. काळी-पांढऱ्या रंगांनी डोळे बोलके बनले आहेत. सर्व मूर्ती सुंदर, सुबक आणि आकर्षक आहेत.

वर्धा- अमरावती जिल्ह्यात मागणी

लाल मातीपासून प्रथमच घरगुती गणपती मूर्ती तयार करण्याचा नवा ट्रेण्ड येथील कुंभार बांधवांनी आत्मसात केल्यामुळे ही पर्यावरणपूरक मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. गणपती मूर्ती स्थापनापासून विसर्जनापर्यंत धार्मिक आनंदोत्सव साजरा करता येतो. त्यामुळे या लाल मातीच्या मूर्तीला वर्धा व अमरावती जिल्ह्यात मागणी वाढली आहे.

लाल मातीपासून गणपती मूर्त्या तयार करण्याचा नवा ट्रेंड यंदा आम्ही हाती घेतला आहे. सुबक व आकर्षक मूर्ती असून ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.

- ओमेश वझे,

दिघी महल्ले

तीन पिढ्यांपासून आमच्या गावातील कुंभार बांधव मातीच्या मूर्ती तयार करतात. यंदा लाल मातीचा गणपती मूर्ती तयार केल्या. ही अभिमानाची बाब आहे.

- गोपिका चावरे,

सरपंच, दिघी महल्ले

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव