पोहरा-वडाळी वनक्षेत्रात ‘रेड अलर्ट’
By Admin | Updated: April 1, 2017 00:30 IST2017-04-01T00:30:19+5:302017-04-01T00:30:19+5:30
गुरुवारी पोहरा जंगलात कुणी तरी अज्ञातांनी ठिकठिकणी तीन बिटला आग लावून वन्यजीवांचा अधिवास जाळण्याचा प्रयत्न केला.

पोहरा-वडाळी वनक्षेत्रात ‘रेड अलर्ट’
पाच हजारांचे बक्षिस जाहीर : एकाच वेळी तीन ठिकाणी वनक्षेत्र जाळले
अमोल कोहळे पोहराबंदी
गुरुवारी पोहरा जंगलात कुणी तरी अज्ञातांनी ठिकठिकणी तीन बिटला आग लावून वन्यजीवांचा अधिवास जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र भर उन्हात आग विझविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी मरणाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
वनविभागाने काठेवाडी, मेंढपाळ व इतरांविरुद्ध गुरे चारण्यास रोखले होते. उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीणा यांनी जबरदस्त मोहीम राबवून गुराख्यांना सळो की पळो करून सोडले. लाखों रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्यामुळे या जंगलाची वाटचाल समृद्धी जंगलाकडे सुरू असताना कुणीतरी जंगलाला आगी लावून राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काल पोहरा बिट वनखंड क्रमांक ४० उत्तर चोरांबा बीट ७८ व इंदला बीटच्या ७० वनखंडात भर दुपारी आग लावली. इंदल्यातील घनदाट जंगलात आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी कठलीही तमा न बाळगता इंदल्यातील आगीवर ब्लोअर मशीन लावून आग विझविले असताना दुपारी ३ वाजताचे सुमारास बोडणा तपोनेश्वर व पोहरा रोडवरच्या जंगलात दोन ठिकाणी आग लावून जंगल जाळण्यात आले. आगीत वन्यजीव हानी झाली नसली तरी जंगल काळेशार झाले आहे. याप्रकरणी तीन वनगुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांना सूचना देण्यात आली आहे.
पश्चिम मेळघाटातील जंगलात आगीचे तांडव
धारणी : उन्हाळा लागल्यास जेमतेम सुरूवात झाली असतानाच मेळघाटातील जंगलात वणवा पेटण्याचा प्रकार सुरू झाला आहे. सध्या पश्चिम मेळघाटातील जवळपास सर्वच जंगल आगीच्या विळख्यात सापडल्याने पर्यावरणात संकट निर्माण झाले आहे. सर्वत्र आगीचे तांडव सुरू झाल्याने वन्यप्राण्यांनी जंगलातून स्थलांतरण करून गावाकडे पळ काढले आहे. पश्चिम मेळघाटात धारणी धूळघाट रेल्वे आणि ढाकणा हे प्रादेशिक वन परिक्षेत्र आहे. हरिसाल, चौराकुंड, तारुबांदा आणि ढाकणा हे व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र आहेत. हे सर्व आग जंगलाला लागून असलेल्या गावातील मोहाफुलांच्या झाडाखालील पाने जाळण्यातून उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, गावातील नेमक्या कोणत्या व्यक्तीकडून हे आग लावली गेली आहे. याचा तपासात संपूर्ण वन विभागाने आपली ताकद लावून दिली आहे. त्यात त्यांना अपयशच येत आहे. (तालुका प्रतिनिधी)