लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपायांच्या २१४ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी ती आनंदवार्ता दिली आहे. २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्या पदांसाठी आवेदन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ती संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. २१४ रिक्त पदांपैकी एकूण ६४ पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.
जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अखत्यारीत तूर्तास ३१ पोलिस ठाणे, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, एसपी कार्यालय, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा व अन्य अकार्यकारी शाखा आहेत. मात्र, जिल्ह्याचा व्याप वाढला असताना जिल्हा पोलिस दलात रिक्त पदांचा अनुशेष निर्माण झाला होता. मात्र, आता ती संपूर्ण २१४ पदे भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिस दलातील अनुशेष भरून निघणार आहे.
... येथे करा तक्रार
जिल्हा पोलिस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. यासंदर्भात पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष, पोलिस भरती समिती-२०२४/२५ तथा पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करू शकता.
कुणासाठी किती पदे ?
अ.जा. : ३, अ.ज. : २०, वि.ज.अ : १३, भ.ज.ब : २, भ.ज.क: ७, भ.ज. ड : १०, विमाप्रः ३, इमाव : २८, एसईबीसी : २५, ईडब्लूएस : ८, खुला : ९२५. सर्वसाधारण : ६९, महिला : ६४, खेळाडू : १०, प्रकल्पग्रस्त : १०, भूकंपग्रस्त : ४, माजी सैनिक : ३१, अंशकालीन पदवीधर : १०, पोलिस पाल्य : ६ व गृहरक्षक दल : १०
Web Summary : Amravati Rural Police is recruiting 214 constables, with applications open October 29 to November 30 online. Sixty-four posts are reserved for women. Vacancies exist across various categories. Report bribery attempts to anti-corruption; contact police officials with concerns.
Web Summary : अमरावती ग्रामीण पुलिस 214 सिपाहियों की भर्ती कर रही है, आवेदन 29 अक्टूबर से 30 नवंबर तक ऑनलाइन खुले हैं। चौंसठ पद महिलाओं के लिए आरक्षित हैं। विभिन्न श्रेणियों में रिक्तियां हैं। रिश्वतखोरी के प्रयासों की सूचना भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो को दें; चिंताओं के साथ पुलिस अधिकारियों से संपर्क करें।