धामणगावात भुईमुगाची विक्रमी आवक

By Admin | Updated: May 20, 2016 00:13 IST2016-05-20T00:13:02+5:302016-05-20T00:13:02+5:30

एकेकाळी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या येथील बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे.

The record of groundnut in groundnut | धामणगावात भुईमुगाची विक्रमी आवक

धामणगावात भुईमुगाची विक्रमी आवक

५३०० रू. दर : जळगाव, मलकापुरातील व्यापारी खरेदीसाठी दाखल
धामणगाव रेल्वे : एकेकाळी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या येथील बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे. यंदाच सुरू झालेल्या भुईमुगाच्या खरेदीला तब्बल ५ हजार ३०० रूपये भाव मिळाला आहे़ दररोज साडेतीन हजार पोत्याची आवक येथील बाजार समितीत होत आहे़
धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी कपाशी, गहू, हरभरा, तूर तसेच अनेक धान्याची खरेदी करण्यात येते़ यंदा प्रथमच बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे यांच्या संकल्पनेतून भुईमूग खरेदीला सहा दिवसांपूर्वी सुरूवात झाली़ आज ५ हजार ३०० रूपये भाव भुईमुंगाला मिळाला आहे़ यवतमाळ, आर्वी, वर्धा, अमरावती, बाभुळगाव, देवळी, येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भुईमूंग विक्रीसाठी येथील बाजार समितीच्या यार्डवर आणला आहे़
तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा भुईमुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात केला तर इतर ठिकाणावरील भुईमुगाची आवक वाढल्याने जळगाव, मलकापूर, यवतमाळ, नेर, अमरावती, वर्धा, नागपूर, येथील व्यापारी भुईमूग खरेदीसाठी आले आहेत़ इतर बाजार समितीच्या तुलनेत दररोज साडेतीन हजार पोत्यांची आवक येथील बाजार समितीत होत असून प्रत्येक ढिगाचा हर्ऱ्हास तोंडी बोलीप्रमाणे व अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे़ आगामी काळात उडीद, मुगाची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे व उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: The record of groundnut in groundnut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.