शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मेळघाटातील १०५ बंदुका जप्त करण्याची वन्यजीव विभागाकडून शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:16 IST

  मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात एकूण १०५ जणांकडे परवानाप्राप्त बंदुका आहेत. यात पीकसंरक्षणार्थ ८७, तर आत्मसंरक्षणार्थ १८ बंदुका आहेत. 

- अनिल कडू अमरावती -  मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात एकूण १०५ जणांकडे परवानाप्राप्त बंदुका आहेत. यात पीकसंरक्षणार्थ ८७, तर आत्मसंरक्षणार्थ १८ बंदुका आहेत. बंदूक परवानाधारकांनी परवाना नूतनीकरणाकरिता धारणी येथील सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाºयांकडे अर्ज सादर केले आहेत. उपविभागीय अधिकाºयांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग व सिपना वन्यजीव विभागाकडून नूतनीकरणासंदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल मागविला. वन्यजीव विभागाने बंदूक परवान्याचे नूतनीकरण न करता, त्या बंदुका जप्त करण्याची शिफारस केली आहे. बालाजी दादू (मेमना), भैयालाल सोनाजी पटेल (तारुबांदा), छोटेलाल भैयालाल कासदेकर (नांदुरी), हिराजी बाटू, चिमोटे (मालूर), पुण्या बाटू कोरकू (मालूर), ओंकार जगन जावरकर (पोटीलावा), हिरालाल लंगडा (लवादा), भुºया खुडी कोरकू (मांगीया), नंदलाल श्रीपाल धिकार (चौराकुंड), सानू आडा मावसकर (तांगडा), बाटू मनांक जावरकर (नांदुरी), भुरेलाल बाबू ओझा (मांगीया), हिरालाल नंदा चिमोटे (मालूर फॉरेस्ट) या १३ लोकांकडील बंदुका जप्त करण्याची शिफारस गुगामल वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे. बंदूकधारक शस्त्राचा दुरुपयोग करून वन व वन्यजिवांचे नुकसान करू शकतात, असा आक्षेपही वन्यजीव विभागाने वर्तविला आहे. आक्षेप नोंदविताना चिखलदरा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरण २२/१९ दि. ०१/१२/२०१८ चा उल्लेख उपवनसंरक्षकांनी केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. उपनवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी बंदूक परवाना नूतनीकरण न करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण), धारणी व चिखलदरा पोलीस ठाणे, सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आणि तारुबांदा, हरिसाल, ढाकणा, चिखलदरा येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी कळविले आहे. चिखलदरा तालुक्यात यांच्याकडे आहे शस्त्र परवानाचिखलदरा तालुक्यात चंद्रकुमारसिंह लालबहादूर किल्लेदार व लक्ष्मण किसन चव्हाण (चिचखेडा), भिकमचंद राधेश्याम खंडेलवाल (चिखलदरा), रघुनाथ कृष्णाजी येवले व मधुकर कृष्णाजी येवले (चुर्णी), लक्ष्मीनारायण अंबाचरण शिवहरे (टेंब्रुसोंडा) तसेच तारूबांदा, चौराकुंड, कुंड, कोहा येथील वनपाल अशा दहा लोकांकडे आत्मसंरक्षणार्थ, तर पीक संरक्षणार्थ ४४ जणांकडे बंदुकी आहेत.  धारणी तालुक्यात यांच्याकडे आहे शस्त्र परवानाधारणी तालुक्यात शेख अहमद शेख अशरफ (बैरागड), अ. फहीम अ. अजीम, अशोक वासुदेवराव खार्वे, अ. सहिद अ. वहीद, लक्ष्मणगीर दत्तुगीर गिरी (धारणी), शेख इकबाल शे. इस्माइल (बैरागड), हबीब खान इस्माईल खान (कुसुमकोट), अलबदसिंग हुकूमचंद राठोड (सावलीखेडा) या आठ लोकांकडे आत्मसंरक्षणार्थ, तर ४३ जणंकडे पीक संरक्षणार्थ बंदुकी आहेत.  मेळघाटात बंदुकीचा दुरुपयोग करून वन व वन्यजिवांचे नुकसान करण्याचे नाकारता येत नाही. बंदूकधारकाचा बंदूक परवाना रद्द करून बंदूक जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. - विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र