विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:59+5:302021-03-18T04:13:59+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा ...

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा अभ्यासक्रम पुढील वर्षी सुरू होणार आहे. अधिसभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख स्व. अमोल निस्ताने यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता प्रदान केली आहे. या विषयाचा अभ्यासक्रम तयार करणे, विद्धत परिषदेची मंजुरी, व्यवस्थापन परिषदेची मान्यता असा एकंदरित प्रवास आता होणार आहे. त्याकरिता वर्षभराचा कालावधी लागणार आहे. शैक्षणिक सत्र २०२२ -२०२३ या पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल, अशी तयारी विद्यापीठाने चालविली आहे. अधिसभेने या अभ्यासक्रमासाठी २२.२० लाखांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रफुल्ल गवई यांनी दिली. हा अभ्यासक्रम आजीवन अध्ययन व विस्तार केंद्रातून संचालित करण्यात येणार आहे.
---------------
या अभ्यासक्रमांनाही मिळाला निधी
संस्कृत: २२.२० लाख
मानसशास्त्र: २२.२० लाख
परफॉमिंग आर्ट: १५.५० लाख
एमएस्सी एमचआरसी: १०३.४८ लाख
--------------------
स्व. अमोल निस्ताने यांच्या मागणीनुसार अधिसभेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच सभागृहात मॉ जिजाऊ, शिवरायांची प्रतिमा लावण्यात आली आहे. अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरू होईल.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ