आयटीआय प्रवेशाकरिता १ हजार ४५० अर्ज प्राप्त
By Admin | Updated: July 15, 2014 23:53 IST2014-07-15T23:53:11+5:302014-07-15T23:53:11+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १ हजार १२५ असून आतापर्यंत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये १ हजार ४५० अर्ज प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी

आयटीआय प्रवेशाकरिता १ हजार ४५० अर्ज प्राप्त
अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १ हजार १२५ असून आतापर्यंत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये १ हजार ४५० अर्ज प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी २४ जुलै तर अंतिम यादी २८ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
आयटीआय प्रवेशाकरिता आॅनलाईन अर्ज १० जुलैपासून सुरु करण्यात आलीे. जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता १,१२५ विद्यार्थ्यांची क्षमता असून त्याकरिता ४७ तुकड्यांमार्फत विद्यार्थ्याना विविध ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये मुला-मुलींचा सहभाग आहे. १० जुलै पासून शहरातील विविध संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरणे सुरु केल्यावर पहिल्या दिवशी १०० अर्ज प्राप्त झाले होते. तर दुसऱ्या दिवशी १३५ व तिसऱ्या दिवशी जवळपास २०० अर्ज विद्यार्थ्यांनी भरले.
१५ जुलै पर्यंत आॅनलाईन
अर्ज प्रवेश प्रक्रियेत १ हजार ४५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
२४ जुलै रोजी लागणार मेरिट यादी
येत्या २२ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा आयटीआयमार्फत देण्यात आली असुन यावर्षी प्रवेश अर्जामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत आयटीआय प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी चागला प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशिक्षणाकडे अधिक कल दिसुन येत आहे, असे आयटीआयचे उपप्राचार्य डी. डी .मानकर यांनी सांगितले.
यावेळी एकाच अर्जामधुन विविध आयटीआय संस्थेमध्ये विद्यार्थी अर्ज करु शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यासाठी ही प्रक्रिया लाभदायक ठरत आहे. यामध्ये केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची धावपळ अधिक दिसुन येत आहे. २२ जुलै पर्यंत अर्ज स्विकृत केल्या जाणार असुन २४ जुलै रोजी पहीली मिरीट यादी तयार केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज तपासले जाणार असुन त्यामध्ये त्रुटी आढळल्यास २४ व २५ जुलै रोजी त्रृटी दुरुस्तीकरिता विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे. अंतिम यादी २८ जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही दिवस मेरीट यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.