विद्यापीठात प्रश्न बँक होणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:22+5:302021-01-08T04:37:22+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने भविष्याचा वेध लक्षात घेता प्रश्न बँक तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महाविद्यालय ...

विद्यापीठात प्रश्न बँक होणार तयार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने भविष्याचा वेध लक्षात घेता प्रश्न बँक तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महाविद्यालय निहाय विषयांसाठी लॉगीन दिले जाणार असून, स्वतंत्रपणे पोर्टल असणार आहे. कोणत्याही परीक्षेसाठी ही प्रश्न बँक वापरता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली जाणार आहे.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गाईडलाईननुसार विद्यापीठाने प्रश्न बँक तयार करणे अपेक्षित आहे. त्यात पारंपरिक, ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांसाठी प्रश्न बँक तयार करावी लागणार आहे. प्रश्न पारंपरिक पद्धतीनुसार गोळा करण्यात येतील. विषय शिक्षकांकडून प्रश्न ऑनलाईन मागविले जाणार आहे. प्रश्न बँक तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळाची
मान्यता मिळाल्यानंतर या विषयाला मूर्त रूप येईल, अशी माहिती आहे. शाखानिहाय, विषयनिहाय प्रश्न बँक तयार होणार आहे.
----------------------
एका अभ्यासक्रमांसाठी असेल ३०० ते ४०० प्रश्न
विद्यापीठ प्रश्न बँक तयार करताना एका अभ्यासक्रमांसाठी ३०० ते ४०० प्रश्न तयार करण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान आणि आंतर विद्याशाखीय अशा चारही शाखांसाठी एकूण चार हजार अभ्यासक्रम आहे. सुमारे दीड लाख प्रश्न बँक तयार करण्यात येणार आहे. त्यात दरवर्षी वाढ होईल, असे नियोजन सुरू आहे.
--------------------------
नव्या वर्षात नवा संकल्प म्हणून विद्यापीठ प्रश्न बँक तयार करत आहे. ऑनलाईन प्रश्न मागविले जातील. एकंदरीत चार हजार अभ्यासक्रमांसाठी दीड लाख प्रश्न तयार केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बहुपर्यायी प्रश्न बँक तयार होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ