अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:53+5:302021-03-09T04:16:53+5:30
राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे मानव विकासाच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणारा आहे. आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करणे ...

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे मानव विकासाच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणारा आहे. आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करणे ही बाब अनेक अर्थसंकल्पातून दुर्लक्षित राहिली होती. यामध्ये नव्याने प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषिकर्ज व्याजात सवलत, ग्रामीण रस्ते विकासासाठी भरीव तरतूद, सिंचन प्रकल्पातील तरतूद, कृषी विद्यापीठ संशोधनाला दिलेले प्रोत्साहन आदी बाबी राज्याला दिशादर्शक ठरणार आहेत. तरीदेखील पेट्रोल, डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमतींबाबत दिलासा मिळाला असता, तर सर्वसामान्य नागरिकांना हायसे वाटले असते.
डॉ. विनोद गावंडे, विभाग प्रमुख, पदव्युत्तर अर्थशास्त्र
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
०००००००००००००००००००
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
- राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेनुसार महिलेच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्के सूट
-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेतंर्गत बारावीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास
- राज्य राखीव दलात महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी
- अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित
- थकीत वीज बिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट
- प्रत्येक तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका
- ग्राम समृद्धी योजनेतून गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा
-प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेसाठी भरीव निधी
- महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क
- महिला व बाल कल्याण सशक्तीकरण योजनेसाठी तीन टक्के निधी राखीव
- जिल्ह्यातील लासूर येथील मंदिराचे संवर्धन व जतन
- एससी विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एका शासकीय निवासी शाळेत सहावीपासून सीबीएसई अभ्यासक्रम
- अपंगाच्या मदतीसाठी वेब अप्लिकेशन
- १०० आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळेत रूपांतर