मांजरखेड कसबा : महाराजस्व अभियानांतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम मांजरखेड कसबा येथे राबविण्यात आला. अनेकांच्या समस्यांच्या जागेवरच समाधान करण्यात आले. महसूल विभागातर्फे तहसीलदार राजेंद्र इंगळे याच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
सरपंच दिलीप गुल्हाने, उपसरपंच किरण देशमुख, ग्रामसेवक इंगळे, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी यावेळी उपस्थित होते. रेशन कार्डमधील नावे कमी-अधिक करणे, सात-बारामधील दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी मंडळ अधिकारी सतीश गोसावी, तलाठी मलमकर, ग्रामपंचायत सदस्य सागर खोडके, संजय गांधी विभागाचे प्रमुख राहुल कुकडे, पुरवठा विभागाच्या राणी आंबेकर, महसूल विभागाचे चंद्रशेखर मोरे, नैसर्गिक आपत्तीबाबत चंद्रकांत जयसिंगपुरे तसेच माजी सरपंच शैलेश देशमुख, माजी उपसरपंच प्रमोद बिजवे आदी उपस्थित होते. संचालन मंडळ अधिकारी सतीश गोसावी यांनी केले.