गाडगेनगर प्रभागात रावसाहेबांची उत्स्फूर्त रॅली
By Admin | Updated: October 3, 2014 01:03 IST2014-10-03T01:03:17+5:302014-10-03T01:03:17+5:30
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या प्रचार रॅलीला गाडगेनगर प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गाडगेनगर प्रभागात रावसाहेबांची उत्स्फूर्त रॅली
अमरावती : काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या प्रचार रॅलीला गाडगेनगर प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीदरम्यान शेखावत यांनी या भागातील मतदारांशी संवाद साधला.
ही रॅली भाऊ कॉलनी, प्रेरणा कॉलनी, राधानगर, गाडगेनगर, विनायकनगर, गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसर, नामदेव महाराज मंदिर परिसर, रिमांड होम परिसरात काढण्यात आली. संजय खोडके यांच्या निवासस्थानाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत वसंतराव साऊरकर, वंदना कंगाले, विलास इंगोले, अर्चना सवाई, धीरज हिवसे, रवींद्र इंगोले, राजा बांगडे, अमोल इंगळे, अक्षय भुयार, सविता भेले, बंडू हिवसे, जयश्री वानखडे, विवेक गोहाड, राजेंद्र महल्ले, गंगाराम बागडे, के.बी. पाटील व नागरिक सहभागी झाले होते. रॅलीसाठी जयंत खोपडे, पंकज देशमुख, राजू भेले, नूतन भुजाडे, धनंजय भुजाडे, प्रवीण दळवी, रामकृष्ण गोटे, अनिल शेवाळे, संगीता वाघ, वैभव राऊत, मंगेश निंभोरकर, अनिकेत उताणे, जया बद्रे, राजू गवई, देवेंद्र पोहोकार, गजानन हरणे, सुनील ढवळे, अमोल ठाकरे, अर्चना राजगुरे आदींनी परिश्रम घेतले.
रिपब्लिकन आघाडीचा पाठिंबा
काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांनी पाच वर्षांच्या कालावधित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व भीमटेकडीचे सौंदर्यीकरण, उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक कार्य केले. या कार्याला गती मिळावी, यासाठी जाहीर पाठिंबा देत असल्याचे रिपब्लिकन आघाडीचे दीपक सवाई, विदर्भाध्यक्ष सुनील उगले, दिनेश पोहेकर, दशरथ उगले, सुनील इंगळे आदी कळविले आहे.