शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापली तर फटके मारू, रविकांत तुपकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 20:31 IST

सोयाबीनची आयात थांबविण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आंदोलन...

अमरावती - विदर्भात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून अतिपावसाने ते खराब झाले आहे. कापसाचे पीकही हातातून गेले आहे. उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले आहे. ती तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांना फटके मारू, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी दिला. ते पत्रपरिषदेत बोलत होते.

१२ नोव्हेंबर रोजी आंदोलन -यंदा सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांना विम्याची रक्कम खात्यात जमा करा, सोयाबीनची आयात थांबवा, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा व संत्रा उत्पादकांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या. अशा मागण्या करत शेतकरी स्वाभिमान संघटनेतर्फे १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

शेतकरी नापिकीमुळे मृत्यूला कवटाळत असताना विधानसभेत शेतकऱ्यांचे हे गहण प्रश्न मांडण्याऐवजी लोकप्रतिनिधी ड्रग्सप्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानच्या मुद्द्यावर चर्चा करतात, हे कृषिप्रधान देशासाठी निंदनीय असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, पण ते शेतकऱ्यांचा मुद्दा कधीच मांडत नाहीत, या प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर तुपकर यांनी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे येत्या काही दिवसात यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील, असे स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, अमित अढाऊ, रवि पडोळे, मंगेश फाटे, शैलेश ढोबळे, भगवंत वानखडे, अमोल महल्ले, श्याम अवथळे (बुलडाणा), दयाल राऊत (नागपूर), संकेत दुरकर, अरुण लाड, पुरुषोत्तम बन्सोड, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी उपस्थित होते.

दोन्ही सरकारला दखल घेण्यास भाग पाडू -शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून शेतीत घाम गाळला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लावलेला उत्पादनखर्चही निघू शकला नाही. परिणामी मृत्यूला कवटाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, ज्याने आपल्यावर मरायची वेळ आणली त्याला मारायचे आहे. त्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले आहे. याची दखल केंद्र आणि राज्य सरकारला घेण्यास भाग पाडू, असे ठामपणे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी