शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीतून बडनेरात रवी राणांकडून उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:58 IST

Amravati : जागा वाटपाचा पत्ता नाही; देवेंद्र फडणवीसांनी हिरवी झेंडी दिल्याचा दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती वा महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र ठरले नाही. मात्र, आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून महायुतीचे आपणच उमेदवार, तशी हिरवी झेंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दुजोरा मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. आ. राणा यांचा दावा महायुतीतील इच्छुकांना 'जोर का झटका...' मानला जात आहे.

विधानसभा निवडणुका वेळेवर होतील, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मार्चेबांधणी चालविली असून 'मेरीट' उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी महायुतीत घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला बडनेरा मतदारसंघ वाट्याला येणार आहे. मीच उमेदवार असेल. माझ्या उमेदवारीला भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत हिरवी झेंडी दिल्याचा दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर महायुतीतून विधानसभेसाठी पाच ते सहा जागांच्या मागणीचा प्रस्तावही दिल्याचे ते म्हणाले. भाजपने बडनेरा मतदारसंघावर दावा केला नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी ज्या २५ जागा मागितल्या, त्यामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, असे आ. राणा यांनी सांगितले. परंतु, महायुतीत जागा वाटपाची चर्चा नाही. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांमध्ये उमेदवारीबाबत कोणतीही बोलणी नाही. असे असताना आमदार रवी राणा यांनी बडनेन्ऱ्यातून स्वतःच उमेदवारीवर दावा ठोकल्याने महायुतीत 'ऑल वेल' नाही, असे संकेत मिळत आहेत. 

भाजप, शिंदेसेना इच्छुकांचे काय? बडनेरा मतदारसंघातून रवि राणा यांनी महायुतीतून उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना मिळालेल्या २६ हजार ७६३ मताधिक्यांचा आधार घेत बडनेरातून भाजप आणि शिंदे सेना इच्छक उमेदवारांकडून दावेदारी केली जात होती. मात्र, आता राणांच्या या निर्णयामुळे भाजप, शिंदेसेनेची दावेदारी कागदावर तर नाही ना, याविषयी जोरदार चर्चा होत आहे.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाAmravatiअमरावती